Suriya Retro Vs Ajay Devgn Raid 2 Box Office Collection
मुंबई : साऊथचा तमिळ हिरो सूर्याचा ॲक्शन ड्रामा रेट्रोने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सूर्याचा मागे रिलिज झालेला कंगुवा फारसा चालला नसला तरी सूर्याने पुन्हा रेट्रोमधून कमबॅक केले आहे. या चित्रपटाने दमदार ओपनिंग केले आहे. दुसरीकडे अजय देवगनचा रेड २ ने दुसऱ्या दिवशी कासव गती पकडली आहे.
कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित रेट्रो १ मे ला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पूजा हेगडे, जयराम, श्रिया सरन, प्रकाश राज आणि नस्सर यासारख्या तगड्या कलाकारांनी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवलं आहे. IMDb नेही चित्रपटाला ८.७ रेटिंग दिली आहे.
चित्रपट समीक्षकंकडूनही रेट्रोला चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. पहिल्या दिवशी रेट्रोने बॉक्स ऑफिसवर रेड २ ला टक्कर दिली होती. रेट्रोने बॉक्स ऑफिसवर १९.२५ कोटींचा गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी रेड २ च्या कमाईत घसरण झालेली दिसली.
दुसऱ्या दिवशी रेड २ चित्रपटाने ११ कोटींहून अधिक कमाई केलीय. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित चित्रपटात अजय देवगन, रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. १ मे ला हा चित्रपट रिलीज झाला होता. आता ओटीटीवरही रेड २ पाहता येणार आहे.