Release date revealed of panchayat season 4
खुसखुशीत कंटेंट, उत्तम अभिनय आणि आपलेपणाचा टच असलेली पंचायत वेबसिरिज गेले 3 सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. आता सिरिजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, जितेंद्र कुमार, संविका, दुर्गेश, सुनीता राजवर आणि पंकज झा स्टारर ही सिरिज पुन्हा त्याच दमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार झाली आहे.
दीपक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय हे या सिरीजचे दिग्दर्शक आहेत, तर चंदन कुमार हे या सिरीजचे लेखक आहेत.
आम्ही तुम्हाला आधीच्या सीझनचा reminder देऊ इच्छितो की, सीझन 3 संपताना प्रधानजींना गोळी लागते, आणि यात ते गंभीर जखमी होतात. यादरम्यान फुलेरा गावात निवडणुकांचं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं, आणि सगळीकडे तणाव पाहायला मिळत होता. तर विकास आता वडील होणार असल्याची बातमी त्याला मिळते.
आगामी सीझनमधील कळीचा मुद्दा म्हणजे रिंकीचे लग्न. रिंकी आणि अभिषेकच्या लग्नाची हालचाल या सीझनमध्ये दिसेल अशी आशा आहे. अर्थातच यावर प्रधानजी आणि मंजू देवी यांची हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण या दोघांना रिंकी आणि अभिषेकचे काय सुरू आहे याची आजिबातच कल्पना नाही.
'पंचायत सीझन ४' च्या ट्रेलरची चाहते वाट पाहत असताना मेकर्सनी तो अजून रिलीज केला नाहीये. पण एक महिन्यापूर्वी एक टीझर नक्कीच रिलीज झाला होता, ज्यामध्ये त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. 8 एपिसोड असलेला चौथा सीझन तुम्हाला 2 जुलैला प्राइम व्हीडियोवर पाहता येईल.