Thama Teaser out  Instagram
मनोरंजन

Thama Teaser | प्रेम, भीती आणि रक्ताळलेला थरार.. रक्तरंजित प्रेमकहाणी 'थामा'चा टीझर रिलीज

थामाचा टीझर रिलीज, रश्मिका-नवाजुद्दीन-आयुष्मानच्या लूकची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

Thama Teaser out now

मुंबई - ना डर कभी इतना शक्तिशाली था, और ना प्यार कभी इतना खूनी! अशी टॅगलाईन देत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी थामा चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मान खुराणा यांचा यापूर्वी कधीही न पाहिलेली भूमिका तुम्हाला पाहता होणार आहे. काल या पात्रांचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले होते.

सोशल मीडियावर हा टीझर पाहता येईल. आदित्य यांनी कॅप्शन लिहिलीय- मॅडॉक हॉरर-कॉमेडी विश्वातील पहिली प्रेमकथा पाहण्यासाठी या दिवाळीला स्वतःला तयार करा. थमाच्या जगात पाऊल ठेवा, हा एक असा सिनेमॅटिक अनुभव आहे जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नाही, जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धमाका करत आहे.

आदित्य सरपोतदार यांच्या 'थामा' चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची पहिली झलक १९ ऑगस्ट रोजी दाखवण्यात येईल.

मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स हॉररपट ‘थामा’ आणत आहे. आयुष्मान आलोकची भूमिका साकारत आहे. मॅडॉक फिल्म्सने पोस्टर शेअर करत लिहिलंय, 'सादर आहे आयुष्मान खुराना आलोक म्हणून माणुसकीची अखेरची अपेक्षा.' त्याच्या लूकमध्ये तो गडद रंगाच्या जॅकेटमध्ये दिसतेय.

तर रश्मिका एका विंटेज ड्रेसमध्ये दिसली. रश्मिकाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं की, “सादर आहे रश्मिका मंदाना ही ताडका रोशनीची पहिली किरण. तर नवाजुद्दीनचा लूक देखील अगदी वेगळा आहे. लांब केस आणि वटवाघुळासारख्या अंदाजात तो दिसत आहे. यावरून नेटकरी अंदाज लावत आहेत की, चित्रपटात वॅम्पायर थीम असेल. नवाजचे पोस्टर शेअर करत मॅडॉक फिल्म्सने म्हटलंय - 'सादर आहे नवाजुद्दीन सिद्दीकी यक्षासन म्हणून काळोखाचा बादशाह.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT