पुढारी ऑनलाईन डेस्क - गीतागोविंदम, डिअर कॉम्रेडसारख्या चित्रपटातून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा यांची जोडी लोकप्रिय झाली. साऊथ इंडस्ट्रीमध्ये काही जाणत्या कलाकारांना माहित होतं की, रश्मिका आणि विजय रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात ते सिद्ध देखील झाले आहे. अनेकदा रश्मिकाने विजयबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत विजयने सांगितले होते की, त्याला असू वाटू लागलं की, आता लग्न करायला हवं.
या कपलने तब्बल आठ वर्षे रिलेशनशीप लपवलं होतं. पण, विजयच्या घरच्या मंडळींनी रश्मिकाला आधीच स्वीकारलं होतं. त्यामुळे लग्न झाल्यानंतर देखील रश्मिकाला सासरी फार वेगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागलं नाही. कारण, विजयच्या आईची आणि रश्मिकाची बॉन्डिंग आधीच उत्तम झाली होती. शिवाय विजयच्या भावाशी देखील रश्मिकाची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे विजय देवरकोंडाची संपूर्ण फॅमिलीने रश्मिकाला स्वीकारलं होतं.
एका मुलाखतीत विजयने रश्मिका बद्दल सांगितलं होतं की, तिचा स्वभाव अगदी मनमिळावू आहे. आम्ही दोघेही ज्या सिनेक्षेत्रात आहोत, तेथील कामे, बिझी शेड्यूल, दिवस-रात्र शूटिंग यामुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ दुरापास्त होतं. या सर्व गोष्टी रश्मिकाने समजून घेतल्या. एखाद्या दिवशी तिला बोलायचं आहे. पण विजय कंटाळला असेल आणि झोपी जात असेल तर ती समजून घ्यायीच. तिच्या कुठल्याही गोष्टीचा दबाव नसायचा. ठिक आहे म्हणून ती समजून घ्यायची. रश्मिकाची हिच सर्वोत्तम गोष्ट विजयला आवडली.
तिचं वागणं, तिची विजयच्या फॅमिलीशी असलेली बॉन्डिंग, तिचा स्वभाव सर्व काही जुळून आलं. त्यामुळे विजयने ठरवलं की, हीच ती वेळ आहे... अन् त्याने रश्मिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लव्ह स्टोरी ऑफ विजय-रश्मिका
गीता गोविंदम २०१८ मध्ये रिलीज झाल्यानंतर प्रचंड यश मिळाले. हा चित्रपट विजय-रश्मिकावर चित्रित करण्यात आला होता. या चित्रपटानंतर दोघांच्या मैत्रीची चर्चाही रंगली. कारण, तो काळ असा होता की, रश्मिका आपल्या खासगी जीवनातील एका घटनेमुळे चर्चेत होती. वयाच्या २२ व्या वर्षी तिचा किरिक पार्टीचा सहकलाकार रक्षित शेट्टी सोबत तिने आपला साखरपुडा तोडला होता. म्हणजेच तिचा हा निर्णय 'गीता गोविंदम'च्या रिलीज नंतर जवळपास एक महिन्यानंतर घेतला गेला होता. यानंतर तिच्या करिअरने देखील नवं वळण घेतलं.
कन्नड चित्रपट इंडस्ट्री सोडून ती तेलुगु आणि तमिळ चित्रपटांकडे वळली, जिथे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. महेश बाबू, कार्थी, अल्लू अर्जुन, नितिन यासारख्या बड्य़ा स्टार्स सोबत तिचे चित्रपट रिलीज झाले.
अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने २६ फेब्रवारी, २०२६ रोजी उदयपूरमध्ये लग्न केले.