Rashmika Mandanna new film announced
मुंबई - रश्मिका मंदानाने तिच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केलं आहे. चित्रपट कुबेराच्या यशस्वी वाटचालीनंतर ती आता नव्या अवतारात दिसणार आहे. घनदाट जंगल आणि खूप धुक्यात ती हातात भाला घेऊन असलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवार २६ जूनच्या सकाळी तिने आपल्या आगामी चित्रपटाची पहिली झलक शेअर केला आहे. ती या लूकमध्ये अगदी वेगळ्या अंदाजात दिसतेय.
रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केलाय. दाट धुक्यात रात्रीच्या जंगलात ती उभी आहे. तिच्या हातात भाला आहे. रश्मिकाचा हा लूक तिच्या अन्य भूमिकांपेक्षा वेगळा असेल. तिने या पोस्टर वर लिहिलंय- “Rashmika Unleashed”, म्हणजेच असं एक रूप जे आधी कधीही पाहिलेलं नाही.
रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “अखेरीस, तुम्हा सर्वांना दाखवता येऊ शकते की, आम्ही कशावर इतकी मेहनत करत होतो, हे तुम्ही कधीही पाहिलं नसेल. मी खूप एक्सायटेड आहे!”
या चित्रपटाची निर्मिती Unformula Films नावाची प्रोडक्शन कंपनी करत आहे. अन्य डिटेल्स उद्या २७ जून रोजी मिळणार आहेत. तिचा कुबेरा चित्रपटदेखीव बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या ५ दिवसात १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यामध्ये धनुष, नागार्जुन, जिम सर्भ यांच्याही भूमिका आहेत.