मनोरंजन

Rashmika Mandanna : रश्मिकाने व्यक्त केल्या तिच्या स्वप्नातील राजकुमाराबद्दलच्या भावना

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या 'पुष्पा' ( Pushpa: The Rise ) या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाने तिला संपूर्ण भारतात लोकप्रियता दिली आहे. तिचा अल्लू अर्जुन (Allu Arjun) सोबतचा 'पुष्पा : द राईज' हा सुपरडुपर हिट ठरला आहे. या चित्रपटासहित रश्मिका तिचा खासगी आयुष्यातील घटनांमुळे देखिल सध्या चर्चेत आहे. ती अर्जुन रेड्डी फेम विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) सोबत रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. पण या सर्व चर्चांना व बातम्यांना बगल देत रश्मिकाने तिच्या स्वप्नातील राजकुमार कसा असेल किंवा त्याच्याबद्दलचे तिचे विचार एका मुलाखती दरम्यान स्पष्ट करताना प्रेम, नातेसंबध याबाबतचे मत व्यक्त केले.

यावेळी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) म्हणाली, 'माझ्यासाठी प्रेम तेव्हा आहे जेव्हा तुम्ही एक दुसऱ्याचा सन्मान कराल एकमेकांना वेळ द्याल. स्वत:ला पार्टनर सोबत सुरक्षित वाटणे म्हणजेच प्रेम असा माझ्यासाठी त्याचा अर्थ आहे. प्रेमाचे विश्लेषण करणे खूप अवघड आहे. कारण, हा सर्व भावनांचा खेळ आहे. प्रेम तेव्हाच होते जेव्हा या भावना दोन्ही कडून असतील फक्त एकाकडूनच असून काय फायदा.'

यावेळी रश्मिकाला (Rashmika Mandanna)  लग्नाबाबतचे मत विचारल्यावर ती म्हणाली, 'मला माहित नाही याबाबत काय विचार करायला हवा, यासाठी अजून माझे वय लहान आहे असे मला वाटते. मी अजून या विषयी विचारच केलेला नाही. पण, तुम्ही असे असायला हवे की, कोणालातरी तुम्ही खूपच आपले अथवा सोईचे वाटला पाहिजे.'

रश्मिकाने या मुलाखतीच्या माध्यमातून उठलेल्या सर्व अफवांना व वावड्यांना निराधार ठरवून बगल देण्याचा प्रयत्न केला. तिने प्रेम आणि लग्नाबाबतचे मत व्यक्त करुन आपल्याकडील असणार फोकस कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, मध्यंतरी ती मुंबईमध्ये विजय देवराकोंडा सोबत एका महागड्या रेस्टॉरंट मध्ये डिनर करताना दिसली होती. तसेच या डिनरसाठी दोघेही एकाच कार मधून आले होते. तेव्हा दोघांमध्ये काहितरी शिजत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. खरंतर या गोष्टींची सुरुवात आधीपासून झाली होती. दोघांनी 'गिता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' चित्रपट केल्यानंतर एकमेकांसोबत यांचे नाव जाडले जात होते. पण, दोघांनी आपला ३१ डिसेंबर गोव्यामध्ये एकत्र साजरा केला. तेव्हा विजय देवराकोंडाचे कुटुंब देखिल सोबत होते. तेव्हा पासून या दोघांच्यामधील प्रेमसंबधांच्या बातम्यांना उधाण आले.

रश्मिका सध्या बॉलिवूडमध्ये डेब्यु करत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ती 'मिशन मंजू' या चित्रपटात काम करत आहे. तसेच ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'गुड बाय' नावाचा सिनेमा करत आहे. तर दुसरीकडे विजय देवराकोंडा याचा 'लायगर' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाद्वारे विजय बॉलिवूडमध्ये डेब्यु करत आहे.

या शिवाय रश्मिकाच्या चाहत्यांसाठी आणखी आनंदाची बातमी म्हणजे, ती पुढील महिन्यापासून अर्थात मार्च पासून 'पुष्पा' चा सिक्वेल असणाऱ्या 'पुष्पा : द रुल' या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT