मनोरंजन

Pushpa 2 : रश्मिका थिरकणार अल्लू अर्जुनसोबत, श्रेया घोषालचा गाण्याला स्वरसाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटाची उत्सुकता आता सगळ्यांना असून या चित्रपटाबद्दल एक नवं अपडेट समोर आले आहे. जेव्हापासून निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे 'द कपल सॉन्ग' चे टीझरचे अनावरण केले आहे. ज्याचे शीर्षक 'अंगारों', 'सूसेकी', 'सूदाना', 'कंडालो' आहे. 'नोडोका' आणि 'AAGUNER' अनुक्रमे हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषेत हे गाणं येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद (रॉकस्टार डीएसपी) आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका श्रेया घोषाल हे गाणं करणार आहेत.

श्रेया घोषालचं डायनॅमिक गाणं, रॉकस्टार DSP चे संगीत

श्रेया घोषालच्या सुमधूर आवाजासह DSP चे हे डायनॅमिक गाणं असणार आहे. 'पुष्पा 2: द रुल' साठी डीएसपीच्या गाण्यांची सर्वांनाच उत्सुकता आहे.

अधिक वाचा-

उद्या पुष्पा २ चे कपल सॉन्ग होणार रिलीज

उद्या (२९ मे) सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी पुष्पा २ मधील द कपल सॉन्ग रिलीज होणार आहे. पुष्पा २ मधील हे दुसरे गाणे असून मेलोडी क्वीन श्रेया घोषालने आपल्या आवाजात सहा भाषांमध्ये गायले आहे. या गाण्यात रश्मिका मंदाना ही अल्लू अर्जुनसोबत थिरकताना दिसणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी 'पुष्पा २: द रूल' च्या दुसऱ्या गाण्याची माहिती देत एक पोस्टर जारी केलं आहे. यामध्ये अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसत आहेत.

अधिक वाचा-

यादिवशी 'पुष्पा २: द रूल' होणार रिलीज

अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २ : द रूल'ची रिलीज डेटची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. हा चित्रपट १५ ऑगस्ट, २०२४ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. त्यांनी पहिला भाग 'पुष्पा: द राईज'चे दिग्दर्शन केले होते. 'पुष्पा २: द रूल' मध्ये फहद फाजिल खलनायक च्या भूमिकेत दिसले.

अधिक वाचा- 

SCROLL FOR NEXT