sanjay dutt r madhavn arjun rampal ranveer singh movie Dhurandhar trailer launched
मुंबई - चित्रपट ‘धुरंधर’चा जबरदस्त ट्रेलर लॉन्च करण्यात आले. आर माधवनच्या लूकने तर सर्वांचे लक्ष वेधले. मुंबईमध्ये आगामी चित्रपट ‘धुरंधर’चा ट्रेलर मोठ्य़ा धामधुमीत लॉन्च करण्यात आले. या खास निमित्ताने रणवीर सिंह, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी आणि दिग्दर्शक आदित्य धर उपस्थित होते.
चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. चित्रपटात रणवीर सिंह, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत आहेत. जाणून घेऊया कसा आहे ट्रेलर?
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंह ॲक्शन अवतारात दिसत आहे. असा ॲक्शन अवतार जो आधीच्या चित्रपटांमध्ये पाहिला नसेल. 'धुरंधर' या वर्षीचा सर्वात चर्चित चित्रपट आहे. आदित्य धरची कथा आहे. ज्योती देशपांडे आणि लोकेश धरची निर्मिती आहे. 'धुरंधर' ५ डिसेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. पाहुया धुरंधरचा ट्रेलर कसा आहे?
‘धुरंधर'च्या ट्रेलरने इशारा केला आहे की, चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहहून अधिक खलनायकांना सादर करण्यात आले आहे. संजय दत्त, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांना खूपच भयानक दाखवण्यात आलं आहे. तिन्हीही खलनायकांचं रौद्र रुप आहे. ही कहाणी भारत आणि पाकिस्तानची आहे. रणवीर सिंहच्या सीनची झलक जी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलीय, ती आधीही व्हायरल झालीय.
‘धुरंधर' ट्रेलर रिएक्शन?
‘धुरंधर' ट्रेलरला फॅन्सनी पसंती दर्शवलीय. एका फॅनने तर हे म्हटलंय की, ही रणवीर सिंहची धमाकेदार वापसी आहे आणि चित्रपट ५०० कोटींहून अधिक कलेक्शन करायला जात आहे. अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आहे, फॅन्सकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत. ट्रेलरमधील रणवीर सिंहचा तो डायलॉग खूप पसंत केला जात आहे, ज्यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की, 'अगर तुम लोगों के पटाखे खत्म हो गए हैं तो मैं धमाका शुरू करूं?' यावरून समजते की, चित्रपट किती प्रभावी असेल.
रणवीर सिंह- एक निर्दयी, भयानक अवतारात
संजय दत्त- एसपी चौधरी असलमच्या भूमिकेत
अक्षय खन्ना- रहमान डकैतच्या भूमिकेत
आर. माधवन- अजय सान्यालच्या भूमिकेत
अर्जुन रामपाल- मेजर इकबालच्या भूमिकेत
ट्रेलर खतरनाक ॲक्शन सीक्वेन्स आणि रक्तपाताने भरलेला आहे. स्टंट आणि दमदार डायलॉग्जने लक्ष वेधलं आहे. ४ मिनिटहून अधिक ट्रेलरमध्ये कहाणीचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे कथेचा एक रहस्य चित्रपट पाहिल्यानंतर उलगडणार आहे.
दोन भागात बनेल धुरंधर
रिपोर्टनुसार, धुरंधरला दोन भागात बनवलं जाईल. पहिला भाग ५ डिसेंबर, २०२५ रोजी रिलीज होईल. तर दुसरा भाग २०२६ च्या उन्हाळ्यात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्टनुसार, धुरंधरला दोन भागात बनवलं जाईल. पहिला भाग ५ डिसेंबर, २०२५ रोजी रिलीज होईल. तर दुसरा भाग २०२६ च्या उन्हाळ्यात रिलीज होण्याची अपेक्षा आहे.