Delhi Blast Ranveer singh Dhurandhar release date changed  Instagram
मनोरंजन

Delhi Blast Ranveer singh Dhurandhar | रणवीरच्या 'धुरंधर'ची ट्रेलर रिलीज डेट टळली, निर्मात्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Dhurandhar trailer date changed | रणवीरच्या 'धुरंधर'ची ट्रेलर रिलीज डेट टळली, निर्मात्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

स्वालिया न. शिकलगार

दिल्ली स्फोटानंतर रणवीर सिंगच्या ‘धुरंदर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पुढे ढकलण्यात आला आहे. निर्मात्यांनी अधिकृत निवेदन जारी करत हा निर्णय संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं सांगितलं आहे. चित्रपटाची नवी रिलीज डेट लवकरच जाहीर होणार आहे.

Delhi Blast Ranveer singh Dhurandhar release date changed

मुंबई - रणवीर सिंहचा आगामी चित्रपट "धुरंधर"चा ट्रेलर रिलीज डेट टळण्यात आलीय. ट्रेलर लॉन्च कार्यक्रम दिल्लीमध्ये बॉम्ब स्फोटातील पीडित आणि प्रभावित कुटुंबाप्रती सन्मानासाठी स्थगित करण्यात आले. या संबंधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे.

दिल्लीतील झालेल्या स्फोटाने केवळ राष्ट्रीय राजधानीलाच नाही तर संपूर्ण देशालाच हादरवून ठेवलं आहे. बॉलीवूड कलाकार देखील या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत दु:ख जाहिर केलं आहे. एकीकडे, मीका सिंहने दिल्ली स्फोटामुळे आपला शो रद्द केला आहे.

तर रणवीर सिंहच्या 'धुरंधर'वर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. निर्मात्यांनी दिल्ली स्फोटामुळे रणवीरचा आगामी ॲक्शन थ्रिलर 'धुरंधर'चा ट्रेलर लॉन्च इव्हेंटला पोस्टपोन केलं आहे. निर्मात्यांनी या संबंधात एक पोस्ट देखील शेअर केले आहे. धुरंधरचा ट्रेलर बुधवारी १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी होणार होता.

धुरंधरच्या टीमची पोस्ट

आता धुरंधरच्या निर्मात्यांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे, "काल दिल्ली स्फोटने प्रभावित पीडित आणि परिवाराच्या सन्मानामध्ये, १२ नोव्हेंबर रोजी होणारा धुरंधर ट्रेलर लॉन्च स्थगित करण्यात आलं आहे. ट्रेलर लॉन्चची नवी तारीख लवकरच जाहिर केली जाईल. तुम्ही समजून घेतल्याने धन्यवाद. जिओ स्टूडियोज, बी62 स्टुडियोज आणि टीम धुरंधर."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT