मुंबई - नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ या दोन भागांच्या थरारक live-action सिनेमॅटिक युनिव्हर्सचा प्रास्ताविक भाग ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ आज जागतिक स्तरावर सादर करण्यात आला. हे लॉन्चिंग भारतातील नऊ शहरांमध्ये चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंग्सद्वारे करण्यात आले. तर न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर भव्य बिलबोर्ड्सद्वारे जागतिक स्तरावर या चित्रपटाची झलक सादर करण्यात आली.
नितेश तिवारी, नमित मल्होत्रा यांच्या बहुप्रतीक्षित महाकाव्य पौराणिक गाथा 'रामायण'चा पहिला लूक समोर आला आहे. कालपासून फॅन्सना उत्सुकता लागून राहिली होती. गुरुवार, ३ जुलै रोजी पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. रणबीर कपूर प्रभू राम आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. रणबीरने नुकतेच रामायणाचा पहिला भाग पूर्ण केला आणि यावेळी तो भावूकही झाला.
हँस झिमर व ए. आर. रहमान — प्रथमच एकत्र संगीत दिग्दर्शन
टेरी नोटरी (Avengers, Planet of the Apes)
गाय नॉरिस (Mad Max: Fury Road) — अॅक्शन कोरिओग्राफी
रवि बन्सल (Dune 2, Aladdin)
रॅम्सी एव्हरी (Captain America) — प्रॉडक्शन डिझाईन
रणबीर कपूर— राम यांच्या भूमिकेत
यश — रावण या सशक्त भूमिकेत (सह-निर्मातेही)
साई पल्लवी— सीता
सनी देओल— हनुमान
रवी दुबे — लक्ष्मण भूमिकेत
यश हा चित्रपटाचा निर्माता देखील आहे. तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. दूरदर्शनवरील रामायण मालिकेत भगवान रामाची भूमिका साकारलेले प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात प्रभू राम यांचे वडील दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत. रकुल प्रीत सिंह शूर्पणखा म्हणून दिसणार आहे. विवेक ओबेरॉय शूर्पणखाचे पती विद्युतजिह्वा म्हणून दिसणार आहेत. चित्रपटात अभिनेत्री इंदिरा कृष्णन भगवान प्रभू राम यांची आई कौशल्या यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काजल अग्रवाल मंदोदरीची भूमिका साकारणार आहे आणि लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे.
ही कथा आपल्यात खोल रुजलेली आहे. ती केवळ पौराणिक नसून एक शाश्वत सत्य आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. हा आत्मा सांभाळून, जागतिक स्तरावर तिचं नव्या भव्यतेत सादरीकरण करणं हे माझं कर्तव्य आणि सन्मान आहे.नितेश तिवारी, दिग्दर्शक
रिपोर्टनुसार, रणबीर कपूरचा रामायण ८३५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.
रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर 'रामायण' हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे, पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.