१० वर्षांनंतर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट राज कपूर यांच्या ‘चोरी चोरी’ने प्रेरित असून आधुनिक प्रेमकथेच्या रूपात सादर होणार आहे. दोघांची सुपरहिट ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
Deepika Padukone-Ranbir Kapoor new film raj kapoor classic film
मुंबई - अबोला मिटवून रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असल्याची माहिती समोर आलीय. तब्बल १० वर्षांनंतर दोघे एक रोमँटिक चित्रपट करणार आहेत, ज्याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहेत.
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन कपल म्हटलं की रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची जोडी अव्वल मानली जाते. ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’सारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर या दोघांनी ज्या जादुई केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली, ती आजही लोक विसरलेले नाहीत. आता तब्बल १० वर्षांनंतर रणबीर-दीपिका पुन्हा एकदा एका रोमँटिक चित्रपटात एकत्र येत आहेत.
नवीन चित्रपटाची कहाणी हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांच्या क्लासिक ‘चोरी चोरी’ (१९५६) या चित्रपटाने प्रेरित असल्याचं समजतं. मूळ चित्रपटातील निरागस प्रेमकथा, प्रवासावेळी वाढणारे भावनिक नाते आणि दोन वेगळ्या लोकांची सुंदर सफर या सर्व गोष्टी पाहता येणार आहे. निर्मात्यांच्या नुसार, ही री-इमॅजिन्ड लव्ह स्टोरी असेल, ज्यात रोमान्स, ट्रॅव्हल, संगीत यांचा सुंदर मिलाफ असेल.
रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ आणि ‘लव्ह अँड वॉर’मुळे चर्चेत आहे. आता त्याच्या झोळीत आणखी एक चित्रपट पडला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाची स्टोरी पूर्णपणे कॉपी असणार नाही. ते आधुनिक पद्धतीन सादर करण्यात येईल. या प्रोजेक्ट सोबत रणबीर प्रसिद्ध RK फिल्म्स बॅनर पुन्हा सुरु करण्याची तयारी करत आहेत.
सध्या रणबीर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल सोबत लव्ह अँड वॉरच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. रणबीर रामायणचे शूटिंग देखील करत आहे. तर दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. एटली दिग्दर्शित अल्लू अर्जुन सोबत एका चित्रपटामध्येही ती दिसणार आहे.