Ranabaali New Release Date out 
मनोरंजन

Ranabaali New Release Date : विजय-रश्मिकाच्या ‘रणबली’ची रिलीज डेट बदलली; यामी गौतमच्या चित्रपटाशी होणार थेट टक्कर

Ranabaali Release Date : विजय-रश्मिकाच्या ‘रणबली’ची रिलीज डेट बदलली; यामी गौतमच्या चित्रपटाशी होणार थेट टक्कर

पुढारी वृत्तसेवा

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. राहुल सांक्रित्यायन दिग्दर्शित ‘रणबली’ आधी 11 सप्टेंबरला रिलीज होणार होता; मात्र आता निर्मात्यांनी नवी रिलीज डेट जाहीर केली असून चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. या बदलामुळे ‘रणबली’ची यामी गौतमच्या ‘नयी नवेली’सोबत बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार आहे. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी 'पिरियड ॲक्शन' चित्रपट 'रणबाली' (Ranabaali) च्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे निश्चित करण्यात आली आहे. या भव्य चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने, म्हणजेच 'मैत्री मुव्ही मेकर्स'ने (Mythri Movie Makers) सोशल मीडियाद्वारे नवी रिलीज डेट जाहीर केली आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतीक्षित ‘रणबली’ हा चित्रपट आता नव्या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या बदललेल्या तारखेमुळे ‘रणबली’ची यामी गौतमच्या ‘नया नवेली’सोबत बॉक्स ऑफिसवर थेट टक्कर होणार आहे. राहुल संकृत्यायन दिग्दर्शित हा ऐतिहासिक चित्रपट विजय आणि रश्मिका यांच्या लग्नानंतरचा पहिला एकत्रित चित्रपट असणार आहे.

तेलुगू आणि तमिळ भाषेत तयार झालेला ‘रणबली’ आता १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होईल. याआधी हा सिनेमा ११ सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नव्या रिलीज डेटची घोषणा करणारे पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिले, आपल्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय या ऑक्टोबरमध्ये उलगडेल. रणबली १६.१०.२६ रोजी मोठ्या थाटामाटात जगभरात प्रदर्शित होईल.

यामी गौतमच्या चित्रपटाशी टक्कर

त्याच दिवशी यामी गौतमचा ‘नयी नवेली’ही थिएटरमध्ये येणार असल्याने दोन्ही चित्रपटांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘रणबली’च्या नव्या पोस्टरनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये विजय देवराकोंडा अतिशय आक्रमक आणि गंभीर लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या खांद्यावर एक मोठं दुमडलेलं शस्त्र असून, त्याच्या चेहऱ्यावरील तीव्र भाव लक्ष वेधून घेणारे आहेत.

पोस्टरच्या मागील बाजूस दिसणारा गडद नारंगी धूर आणि धुळीचं वातावरण चित्रपटात जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. पोस्टर सोशल मीडियावर समोर येताच एका चाहत्याने ‘वाट पाहू शकत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्या युजरने १६ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका होणार असल्याचं म्हटलं आहे.

अर्नोल्ड वोसलूही महत्त्वाच्या भूमिकेत

‘रणबली’ची निर्मिती मैत्री मूवी मेकर्सच्या बॅनरखाली वाय. रविशंकर आणि नवीन येरनेनी करत आहेत. टी-सीरीजसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित या चित्रपटात विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय अभिनेता अर्नोल्ड वोसलूही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

विजय आणि रश्मिकाचे आगामी चित्रपट

रश्मिका मंदाना नुकत्याच शाहिद कपूर आणि कृती सेननसोबत ‘कॉकटेल 2’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे विजय देवराकोंडा गौतम तिन्ननुरी यांच्या ‘किंगडम’मध्ये झळकला. याशिवाय त्याने सिंगीतम श्रीनिवास राव यांच्या ‘सिंग गीतम’मध्ये सरप्राईज कॅमिओही केला आहे. विजयच्या आगामी चित्रपटामध्ये रवि किरण कोला दिग्दर्शित ‘राउडी जनार्दन’ आणि शौर्यव यांच्यासोबतचा आगामी चित्रपटाचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT