vikrant massey clarify role in Ramayana movie  pudhari photo
मनोरंजन

Ramayana | ‘आता अफवा थांबवा!’ राघव जुयालच्या रिप्लेसमेंटवर विक्रांत मेस्सीने अखेर सोडले मौन

Ramayana | 'आता अफवा थांबवा..' राघव जुयालला रिप्लेस करण्यावर विक्रांत मेस्सीने सोडले मौन

स्वालिया न. शिकलगार

रामायण चित्रपटात राघव जुयालला विक्रांत मेस्सी रिप्लेस करणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर जोरात पसरल्या होत्या. या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर विक्रांत मेस्सीने या विषयावर प्रतिक्रिया देत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या वक्तव्यामुळे रामायणच्या कास्टिंगबाबतचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असा संदेशही त्याने दिला आहे.

vikrant massey clarify role in Ramayana movie

बॉलिवूडमधील बहुचर्चित रामायण चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगपासून ते कथानकापर्यंत अनेक गोष्टींबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू असतात. अशातच काही दिवसांपूर्वी विक्रांत मेस्सीच्या जागी राघव जुयालला रामायण चित्रपटामध्ये घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. आता या गोष्टीवर विक्रांतने आपले मत मांडले आहे.

या चर्चांनी इतका जोर धरला की, विक्रांतला स्पष्टीकरण द्यावं लागलं. नितेश तिवारी यांचा चित्रपट रामायणमध्ये 'मेघनाद'ची भूमिका राघव जुयाल साकारणार असल्याचे वृत्त समोर आले. आणि त्यांनी विक्रांत मैसीला रिप्लेस केलं आहे. आता विक्रांत काय म्हणाला पाहुया...

प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितेश तिवारी यांचा बहुप्रतीक्षित "रामायण" चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम यांची भूमिका साकारणार आहे. रवी दुबे लक्ष्मण यांची भूमिका साकारणार आहे, साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यानंतर, असे वृत्त समोर आले की, राघव जुयाल रावणाचा मोठा मुलगा मेघनाद, ज्याला इंद्रजित म्हणूनही ओळखले जाते, तो विक्रांत मेसीची जागा घेईल.

विक्रांत मेस्सी स्पष्टच बोलला...

विक्रांत मेस्सीने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट करत लिहिले, "ठीक आहे. अफवांना पूर्णविराम देऊया. मी कधीच नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाचा भाग नव्हतो. माझ्या 'रिप्लेसमेंट'विषयी बातमी देणाऱ्या अनेक मीडिया पोर्टल्सनी आधी खरे काय आहे, हे तपासायला हवे होते. तरीही, चित्रपटाचा भाग असलेल्या सर्वांना शुभेच्छा, प्रेम..."

मीडिया रिपोर्टनुसार, राघव जुयालला नितेश तिवारी यांच्या रामायणात मेघनाद म्हणून भूमिका देण्यात आली होती. या भूमिकेसाठी सुरुवातीला विक्रांत मेस्सीचा विचार करण्यात आला होता. पण, त्यानंतर निर्मात्यांनी राघवशी संपर्क साधला आणि या भूमिकेसाठी होकार दिला. पण ही बातमी समोर आल्यानंतर विक्रांतने आपले स्पष्ट मत मांडले.

वृत्तानुसार, राघव 'रामायण: भाग २' मध्ये दिसणार आहे, जो २०२७ च्या दिवाळीला रिलीज होईल.

तगडी स्टार कास्ट

रणबीर, रवी, सई आणि यश यांच्याशिवाय सनी देओल 'हनुमान'ची भूमिका साकारणार आहे. लारा दत्ता 'कैकेयी'ची भूमिका, विवेक ओबेरॉय 'विभीषण', अरुण गोविल 'राजा दशरथ', इंदिरा कृष्णन 'कौशल्या', शीबा चड्ढा 'मंथरा' आणि आदिनाथ कोठारे 'भारत'ची भूमिका साकारणार आहे.

या महाकाव्याचा पहिला भाग यावर्षी दिवाळीच्या आठवड्याच्या शेवटी रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT