Ramayana Movie Pudhari
मनोरंजन

Ramayana Movie: ‘रामायण’चा जगभर डंका वाजणार! १०० हून अधिक देशांत रिलीज, तब्बल ५०,००० स्क्रीनवर झळकणार; काय आहे प्लॅन?

Ramayana Movie: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनाबाबत मोठी चर्चा सुरू आहे.

Rahul Shelke

Ramayana Movie: रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा प्लॅन केला जात आहे. जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये तब्बल ५० हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रपटाचा भव्य आवाका, कलाकारांची फळी आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची तयारी यामुळे ‘रामायण’कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या तिकीट विक्रीबाबतही उत्सुकता वाढली आहे.

प्रदर्शनापूर्वीच तिकीट विक्रीला प्रतिसाद

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आठवडाभर आधीच आगाऊ तिकीट विक्रीला सुरुवात झाली होती. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, ब्लॉक केलेल्या सीट्सची मोजणी वगळता चित्रपटाने आगाऊ बुकिंगमधून सुमारे १३ कोटी रुपयांपेक्षा अधिक ग्रॉस कमाई केली आहे. मात्र, हे आकडे सुरुवातीचे असून प्रत्यक्ष कमाईमध्ये बदल होऊ शकतो. चित्रपटाच्या अंतिम कमाईचा अंदाज प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.

हिंदी आणि कन्नड आवृत्त्यांनाही मोठी मागणी

‘रामायण’च्या हिंदी आणि कन्नड आवृत्त्यांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. याशिवाय IMAX आणि 4DX यांसारख्या प्रीमियम चित्रपटगृहांमधील प्रदर्शनामुळेही आगाऊ तिकीट विक्रीला चालना मिळत आहे. मोठ्या पडद्यावर भव्य दृश्ये पाहण्याची संधी, रामायणासारखा लोकप्रिय विषय आणि रणबीर कपूरची भूमिका यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम होणार

‘रामायण’ हा चित्रपट भारताबरोबरच परदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन आहे. १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शन आणि ५० हजार स्क्रीनचा आकडा प्रत्यक्षात साध्य झाल्यास चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळू शकतात.

मात्र, केवळ मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन केल्याने चित्रपट यशस्वी ठरतोच असे नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद, चित्रपटाची कथा, सादरीकरण आणि प्रदर्शनानंतरची तिकीट विक्री या गोष्टीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता ‘रामायण’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT