First look of Ranbir Kapoor's Ramayana drops July 3
मुंबई - व्हिजनरी निर्माते नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण’ चित्रपट आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य चित्रपट मानला जात आहे. आता या महाकाव्याची पहिली अधिकृत झलक प्रेक्षकांसमोर येणार आहे - ३ जुलै २०२५ रोजी. ‘रामायण: द इंट्रोडक्शन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अॅनाउन्समेंट प्रोमोचे एकाच वेळी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि कोची या भारतातील ९ प्रमुख शहरांमध्ये भव्य लॉन्च होणार आहे.
सूत्रांनुसार, पहिल्या भागात या कलाकारांचा समाविष्ट असेल :
• भगवान राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर
• सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी
• रावणाच्या भूमिकेत यश
• हनुमान यांच्या भूमिकेत सनी देओल
• लक्ष्मण भूमिकेत रवी दुबे
• कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता
• शूर्पणखाच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग
• मंदोदरीच्या भूमिकेत काजल अग्रवाल
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली जात असलेली ही कलाकृती, नमित मल्होत्रा यांची प्राईम फोकस स्टुडिओज आणि ८ वेळा ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG, तसेच सुपरस्टार यश यांची मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहनिर्मितीत तयार होत आहे.
या महाकाव्याचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.