पुढारी ऑनलाईन : ८०च्या दशकातील प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा ( Sakshi Chopra) सोशल मीडियात चर्चेत आली आहे. तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
नुकतेच साक्षी चोप्रा ( Sakshi Chopra)ने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने शरीराच्या रंगाचा नेटेड जाळीदार ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने हाय हिल्ससोबत मोकळे केस सोडले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने वेगवेगळे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोनी चाहत्यांच्या काळजाचा ठेका चुकविला आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'बारदान घातले आहेस काय?', तर दुसऱ्या एका युजर्सने 'खूपच हॉट', 'तुला बनवण्यासाठी देवाने खूप मेहनत घेतली असावी' अशा अनेक कॉमेंन्टस केल्या आहेत.
याशिवाय चाहत्यांनी हार्ट आणि फायर ईमोजी देखील शेअर केला आहे. साक्षी चोप्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले बोल्डनेसचे फोटो शेअर करत असते.
कोण आहे साक्षी चोप्रा?
साक्षी चोप्रा ही टीव्ही निर्माती मीनाक्षी सागर यांची मुलगी असून ती रामानंद सागर यांची नात आहे. साक्षी मॉडेल असण्यासोबतच गायिका आणि गीतकार देखील आहे. साक्षीने लंडनच्या ट्रिनिटी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर कॅलिफोर्नियातील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे.
हेही वाचलंत का?