राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी  एक्स
मनोरंजन

Ram Charan : 'RRR' फेम अभिनेत्याच्या घरी पुन्हा इवल्याशा पाहुण्याची चाहूल, पत्नीने व्हिडिओ शेअर करत दिली गुड न्यूज

Ram Charan : रामचरणच्या घरी पुन्हा हलणार पाळणा

Asit Banage

Ram Charan second baby

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'RRR' फेम अभिनेता दक्षिणेचा सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे लवकरच त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या स्वागताची तयारी करत आहेत.

राम चरणची पत्नी उपासनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पाहुणे तिला भेटवस्तू आणि आशीर्वाद देत आहेत. तिने व्हिडिओला कॅप्शनही दिले आहे. यामध्ये लिहिले आहे की, "या दिवाळीत आनंद दुप्पट , प्रेम दुप्पट आणि आशीर्वाद दुप्पट." व्हिडिओचा शेवट "नवीन सुरुवात" असे लिहून केला आहे. ज्यामुळे कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाचे संकेत मिळतात. या व्हि़डिओमध्ये बाळाचे लहान पाय देखील दर्शविले आहेत ज्यामुळे समजते की हे जोडपे पुन्हा आई-बाबा होणार आहेत.

सोशल मीडियावर केली प्रेग्नंसीची घोषणा

राम चरण आणि उपासनाने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. उपासनाने २० जून २०२३ रोजी हैदराबादमध्ये त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचा नामकरण समारंभ देखील मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला असे ठेवले. हे नाव ललिता सहस्रनामातून घेतले गेले. हे नाव शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT