रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे  Twitter
मनोरंजन

Rakul Preet Brother Drug Case | ड्रग्ज केस प्रकरणी रकुल प्रीत सिंहच्या भावाला अटक, कोकेनदेखील जप्त

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रग्ज प्रकरणी रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहला अटक झाली आहे. हैदराबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नार्कोटिक्स ब्यूरो आणि राजेंद्र नगर एसओटी पोलिसांद्वारे संयुक्त मोहिमेनंतर अमनला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलीय.

रकुल प्रीतचा भाऊ अडचणीत

अंमली पदार्थ विरोधी पथकाने हैदराबादमध्ये विकण्यास आलेले २.६ किलो कोकेन जप्त केलं आहे. हैदराबाद पोलिसांनी ही मोठी कार्यवाही करत या रॅकेटचा पर्दाफाश केला. या ड्रग्ज केस प्रकरणी एकूण ३० संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यात बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा भाऊ अमन प्रीत सिंहचे नाव समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हैदराबाद आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे.

अमन हा एक चांगला अभिनेता आहे. त्याने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. तसेच त्याला भटकंती करण्याची आवड देखील आहे. दरम्यान या ड्रग्ज केस प्रकरणावर अध्याप रकुल प्रीत सिंह किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

याआधी २०२० मधील सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासादरम्यान अभिनेत्री रकुल प्रीतचेही नाव समोर आले होते. रिया चक्रवर्तीची आणि सारा अली खानसोबत रकुलचे नाव जोडले गेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT