ड्रग्ज प्रकरण: दीपिका, श्रद्धा, सारा, रकुल यांचे मोबाईल जप्त

Published on
Updated on

मुंबई :  पुढारी ऑनलाईन 

सुशांतसिंग राजपूत च्या आत्महत्येनंतर ड्रग्सचे प्रकरण बाहेर आले आहे. या प्रकरणाणे बॉलिवुड हादरले आहे. ड्रग्जची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) काल दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची केली. यानंतर  दीपिका पदुकोण सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश यांचा फोन एनसीबीने विचारपूस केल्यानंतर ताब्यात घेतला आहे.

वाचा : 'माल' घेत नाही तर १२ वकिलांची फौज कशाला?

या सर्वांच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर केला जाणार आहे. आणि तपासासाठी वापरले जामार आहेत. यापूर्वी या प्रकरणात जया साह, मधु मन्तेना, ध्रुवचा फोनही हस्तगत करण्यात आला आहे. एसीबीने श्रुती मोदींचा फोनही ताब्यात घेतला. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या सर्वांचे फोन जप्त केले आहेत.

सुशांत ड्रग्ज घेत होता : सारा अली खान 


सुशांत ड्रग्ज घ्यायचा असा खुलासा सारा अली खान हिने चौकशी दरम्यान केला आहे. मात्र, मी ड्रग्ज घेतलेले नाही. तसेच मी आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होतो असे वक्तव्यही तिने यावेळी केले. बॉलिवूडमधील डग्ज सेवन प्रकरणात अनेक सनसनाटी खुलासे आतापर्यंत झाले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह १६ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

वाचा :  सुशांत ड्रग्ज घेत होता, त्याच्यासोबत रिलेशीनशिपमध्ये होते;आता सारानंही केला खुलासा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news