Rakesh-Pinkie Roshan Khandala bungalow
मुंबई - अभिनेता ऋतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांच्या खंडाळ्यातील काचेच्या बंगल्याची झलक समोर आली आहे. २०१८ मध्ये राकेश रोशन यांनी या मॅन्शनचा प्लॅन तयार केला होता. त्यानंतर हा कोट्यवधींचा आलीशान बंगला तयार झाला. या हवेलीचे छत खूप सुंदर आहे, येथून खंडाळाचा सुंदर नजारा स्पष्ट दिसतो. छतच इतकी सुंदर सजवलीय की, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारतील. स्टालिश टाईल्स, झाडे आणि फर्नीचर पावसापासून संरक्षणासाठी आधीच कवर करून ठेवले आहे.
फराह खानने राकेश रोशन यांच्या खंडाळा येथील आलीशान बंगल्याची झलक दाखवली आहेत. मुंबईपासून दूर या बंगल्याची झलक फराहने तिच्या यु-ट्यूब चॅनेलवर शेअर केली आहे. यात बंगल्यातील आणि बाहेरील परिसराचे शूट तिने दाखवला आहे.
राकेश रोशन यांच्या या घराचा प्रवास यावेळी फराहने क्रू मेंबर्स आणि कूक दिलीप यांच्या सोबत शेअर केला. निवांत..शांत...हा शीशमहल एखाद्या स्वर्गाहून कमी नाही.
घराच्या छतावरून खंडाळ्याच्या डोंगरांचा सुंदर नजारा, स्वित्झरलँड पेक्षा कमी नाही. लिव्हिंग रुम असो, स्विमिंग पूल असो, बेडरूम असो वा किचन सर्वकाही लक्झरी आहे.
अनेक लिव्हिंग रुम आणि काचेच्या भिंती आहेत. यातून बाहेरील दिसणारा अद्भूत नजारा अवर्णनीय आहे.
फराह खानला राकेश रोशन आणि त्यांची पत्नी पिंकी रोशन यांनी घराचा कानाकोपरा दाखवला.
यामध्ये आलीशान थिएटर आहे. जिथे मोठ्या स्क्रीन समोर अनेक रिक्लायनर्स दिसत आहेत. हवेलीच्या आत जिन्यावरून वर गेल्यानंतर एक शिव मूर्ती आहे.
हवेलीत सुंदर पेटिंग्ज आणि आकर्षक कलाकृती आहेत. हवेलीत अनेक शानदार लिविंग रूम आहेत. विविध सोफे आणि डेकोरेशन आहेत. पिंक पूल टेबल असून बाहेरील डोंगररांगांचा शानदार नजारा दिसतो.
बेडरुम्समध्ये डबल बेड आणि पिवळ्या रंगाच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. हे सर्व पाहून फराह म्हणाली, या घरात जितके मोठे बाथरूम आहे, त्यापेक्षा छोटे तर मुंबईत बेडरूम असते.