मनोरंजन

जुगाड्याचा जुगाड : राजू खेर प्रथमच साकारणार मराठी खलनायक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जुगाड्या या नावात सगळं काही आहे. आपल्या आयुष्यात जगताना येणारे अनेक अडथळे आणि समस्यांना आपण तोंड देत असताना अनेक गोष्टी म्हणजेच आपल्याला करावे लागतात ते म्हणजे जुगाड. अशाच आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या मदतीने आपलं आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मात देणाऱ्या तरुणांची कथा घेऊन आलाय 'जुगाड्या'. हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपट गृहात १४ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात होणार आहे.

सर्वसामान्यांचे वास्तव मांडणारी कथा संदेश (आप्पा) पालकर यांनी जुगाड्याच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर ठेवली आहे. जुगाड्या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्टीत जुगाड शोधणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाच्या बुद्धिमत्तेचा फायदा घेत, ही व्यवस्था स्वतःच्या महत्वकांक्षेसाठी त्या तरुणाचा कसा उपयोग करुन घेते , याची संवेदनशील आणि रंजक अशी कथा 'जुगाड्या" चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
अचानक उद्भवलेल्या कोणत्याही कठीण प्रसंगावर नाविन्यपूर्ण तोडगा काढणारा चित्रपटाचा नायकाची ही कथा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण अलिबाग तालुक्यात करण्यात आली असून विशेष करून नांगरवाडी गावात आणि मुंबईत करण्यात आले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन नरेंद्र ठाकूर यांनी केले तर पटकथा सुनील धुमाळ व नरेंद्र ठाकूर यांनी लिहिली असून चित्रपटाला विक्रांत वार्डे यांनी सुमधुर संगीत दिले आहे . चित्रपटामध्ये दीपक अंगेवार आणि महेश नायकुडे यांनी गीते लिहिली आहेत. रोहित राऊत, वैशाली सामंत, मीरा कारलेकर, अक्षय ठाकूर, हर्षल पाटील, विक्रांत वार्डे, भूमी काळबेरे, आर्यन पडवळ आदी गायकांनी पार्श्वगायन केले आहे. संकलन सुबोध नारकर यांनी केले असून छायाचित्रण स्वप्नील मनवल यांनी केले आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कलाकार राजू खेर यांनी प्रथमच मराठी मध्ये खलनायकाची भूमिका केली असून चैतन्य सरदेशपांडे, जुईली टेमकर, जयराज नायर, सुदेश म्हसिलकर, प्रणव रावराणे, मयूर पवार, प्रदीप वाळके, राजेंद्र जाधव, वैशाली जाधव, सुषमा चव्हाण, मुकेश पाटील हे प्रमुख भूमिकेत असून अलिबाग तालुक्यातील अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT