'जेलर-2'चा टीजर रिलीज Pudhari Photo
मनोरंजन

रजनीकांत पुन्हा जबरदस्त अ‍ॅक्शनमोडमध्ये! 'जेलर-2'चा टीजर रिलीज (पाहा Video)

Jailer 2 Teaser Release | 'जेलर 2' घालणार बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ?

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात परतणार आहे. 2023मधील त्याच्या सुपरहिट चित्रपट 'जेलर'चा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी 'जेलर २' ची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये रजनीकांतची झलक पाहता येते.

'जेलर 2' घालणार धुमाकुळ?

टीझरची सुरुवात 'जेलर २' चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध एका घरात बसून बोलत असल्याचे दिसते. दोघेही आराम करताना आणि एका नवीन पटकथेवर चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, लोक घरात प्रवेश करतात, ज्यामुळे त्यांच्या विश्रांती आणि संभाषणात व्यत्यय येतो. अनिरुद्ध आणि नेल्सनभोवती तोडफोड, गोळीबार आणि आवाज आहे. दोघेही जीव वाचवण्यासाठी कोपऱ्यात लपतात. यानंतर रजनीकांत आत येतो, जो गुंडांना मारण्यासाठी त्यांच्या मागे येतो.

'जेलर २' च्या टीझरमध्ये रजनीकांत रक्ताने माखलेला पांढरा शर्ट परिधान केलेला दिसतोय. त्याच्या एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार आहे. डोळ्यात राग घेऊन तो नेल्सन आणि अनिरुद्धला गुंडांबद्दल विचारतो. दोघेही त्याला हातवारे करून सांगतात की बाकीचे लोक कुठे आहेत. यानंतर, रजनीकांत नेल्सन आणि अनिरुद्ध यांचे घर बॉम्बने उडवून देतो. नंतर, त्याला सुपरस्टारला मारण्यासाठी आलेल्या गुंडांच्या संपूर्ण सैन्याचा सामना करावा लागतो. टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की 'जेलर 2' हा चित्रपट अ‍ॅक्शन, बदमाशी आणि मारामारीने भरलेला असणार आहे.

Jailer 2 Teaser Release | रजनीकांतच्या कार्यकिर्दीतील महत्वाचा सिनेमा

'जेलर 2' हा रजनीकांत यांच्या 2023 मध्ये आलेल्या 'जेलर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये रजनीकांतचा अद्भुत अवतार लोकांना खूप आवडला. हा रजनीकांतच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. 'जेलर' हा तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आता निर्मात्यांना 'जैलर 2' कडून खूप आशा आहेत. सध्या चित्राच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT