

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलीम- जावेद यांच्या चित्रपटाच्या कथा पूर्वीच्या हिंदी चित्रपटात फेमस होत्या. तशी स्टोरी अनिल देशमुख यांच्याकडून रचण्यात येत आहे. निवडणूकीत आपल्या मुलाचा पराभव दिसत असल्यानेच त्यांनी ही स्टोरी रचली, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१९) माध्यमांशी बोलताना केला.
अनिल देशमुख यांच्या गाडीवर मारण्यात आलेल्या दगड हा गाडीच्या मागील बाजूच्या काचेवर मारण्यात आला होता. मागील बाजूस मारण्यात आलेला दगड त्यांना समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड फक्त रजनीकांतच्या चित्रपटातच लागू शकतो, असा टोला लगावत हा सिनेमा तयार करण्यात आला असून आपल्या मुलाचा निवडणूकीत पराभव दिसत असल्यामुळे अशा प्रकारची स्टोरी तयार करण्यात आली. भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्टोरीला शरद पवारांसह सर्वांनी जाणीवपूर्वक इकोसिस्टिम उपलब्ध करून दिली. पण आज त्यामधील सत्य समोर आले आहे, असेही ते म्हणाले.