The 50 Rajat Dalal latest health updates  instagram
मनोरंजन

The 50 Rajat Dalal |'द-५०'च्या टास्कमध्ये रजत दलालला मोठी दुखापत, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून फोटो व्हायरल, प्रकृतीबद्दल अपडेट समोर

रजत दलाल रुग्णालयात दाखल! ‘The 50’ स्टारच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

स्वालिया न. शिकलगार

‘The 50’ या शोमधून प्रसिद्ध झालेला फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल याला नुकतीच गंभीर दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

The 50 Rajat Dalal health update

द ५० शोचा स्पर्धक रजत दलालची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलीय. The 50 टास्क दरम्यान त्याच्या टेंडनला (Tendon) ( पायामध्ये स्नायूंना हाडाशी जोडणारा भाग) दुखापत झाली होती. आता त्याने आपल्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलीय.

सोशल मीडिया स्टार रजत दलाल The 50 रिॲलिटी शोतून चर्चेत आला आहे. शोमध्ये एका टास्क दरम्यान त्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झाला. यानंतर त्याला तत्काळ‍ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर रुगणालयातील बेडवरील फोटो शेअर केला. सोबतच एक कॅप्शनदेखील लिहीली. फोटोमध्ये त्याची शस्त्रक्रिया झालेली दिसते. सोशल मीडियावर रजत दलालचा हा फोटो व्हायरल होत असून त्याने आपल्या प्रकृतीबद्दल अपडेट दिलीय.

रुग्णालयातून फोटो केला शेअर

इन्स्टाग्रामवर त्याने दोन फोटोज शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये तो रुग्णालयातील बेडवर दिसतो. फोटोजच्या कॅप्शनमध्ये रजतने लिहिलं, ‘पडल्यानेच माणूस उठायला शिकतो.’ सोबतच त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या रिपोर्टचा फोटो देखील शेअर केला आहे. एक व्हिडिओ देखील शेअर केला असून त्याने आपल्या प्रकृतीबद्दल अपडेट माहिती दिली.

"सर्वांना नमस्कार! सगळे विचारत आहेत की मला काय झाले आहे. द ५० च्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी माझे टेंडन फाटले. तो २.८ सेमी जाड फाटले होता. मी अधिक काम केल्यानंतर, तो ३ सेमी पर्यंत फाटला. शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार होता. त्यानंतर, मला शोसाठीही जायचे होते. मी शो सोडण्याचा कोणताही हेतू नव्हता."
- रजत दलाल, सोशल मीडिया स्टार

कोण आहे रजत दलाल (who is Rajat Dalal)

रजत दलाल हे फिटनेस क्षेत्रात लोकप्रिय नाव मानले जाते. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. फिटनेस, जिम आणि हेल्थबद्दलचे व्हिडिओ आणि टिप्समुळे तो तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाला आहे. ‘The 50’ या शोमधून त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली.

दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT