Raja Shivaji Teaser Out Pudhari
मनोरंजन

Raja Shivaji Teaser: ‘राजा शिवाजी’चा टीझर रिलीज! अंगावर काटा आणणारा ऐतिहासिक अनुभव; स्वराज्याच्या लढ्याची भव्य कहाणी

Raja Shivaji Teaser Out: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत असून दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.

पुढारी वृत्तसेवा

Raja Shivaji Teaser Out: मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेला ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट 1 मे 2026 रोजी, म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

ऐतिहासिक कथानक

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला लढा आणि दूरदृष्टीने उभारलेले मराठा साम्राज्य, या सर्वांचा आढावा या चित्रपटातून घेण्यात येणार आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, प्रेक्षकांना भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा भव्य सिनेमा असेल.

दिग्गज कलाकारांची फौज

‘राजा शिवाजी’मध्ये अनेक नामवंत कलाकार एकत्र झळकणार आहेत. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, भाग्यश्री, फरदीन खान यांसारख्या दिग्गज कलाकारांचा यात समावेश आहे.

स्वतः रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, त्याच्या लूकनेच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. तर जेनेलिया देशमुख या सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

अजय-अतुलचे संगीत

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रसिद्ध जोडी अजय-अतुल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या भव्य आणि प्रभावी संगीतामुळे चित्रपटाला वेगळी उंची मिळेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले छायाचित्रकार संतोष सिवन या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यामुळे चित्रपटाची दृश्यात्मक मांडणी विशेष भव्य आणि दर्जेदार असेल, असे संकेत मिळत आहेत.

दोन भाषांमध्ये होणार रिलीज

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. Jio Studios प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित या चित्रपटाबाबत आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे.

महाराष्ट्र दिनी रिलीज

हा चित्रपट 1 मे 2026 रोजी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार स्टारकास्ट आणि भव्य निर्मितीमूल्य यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT