रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाचे नवीन आणि अत्यंत प्रभावी पोस्टर १० एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रितेशचा तेजस्वी अवतार पाहायला मिळत आहे. १ मे २०२६ रोजी हा ऐतिहासिक चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
unveils intense Raja Shivaji poster as ‘Chhatrapati’ anthem by Ajay–Atul
प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती रितेश देशमुखच्या नव्या चित्रपटाची. सर्वात भव्य ऐतिहासिक चित्रपट मानल्या जाणाऱ्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) चित्रपटाचे नवीन पोस्टर आता नुकतेच प्रदर्शित झाले आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीच्या या नव्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख छत्रपतींच्या भूमिकेत घोडेस्वार झालेला दिसत आहे. हाती भगवा ध्वज, अत्यंत करारी आणि स्वराज्याच्या ध्येयाने प्रेरित भेदक नजर असा लूक या पोस्टरमध्ये दिसतो आहे.
अजय-अतुलचं 'छत्रपती' अँथम
चित्रपटाच्या पोस्टरसोबतच सर्वात मोठी अपडेट म्हणजे यातील पहिले गाणे 'छत्रपती' येत्या सोमवारी म्हणजेच १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या गाण्याला दिग्गज संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीत दिले असून त्यांनीच ते गायले आहे. नुकताच या गाण्याचा एक बीटीएस (BTS) व्हिडिओ समोर आला असून, त्यातील नाशिक ढोल आणि अजय-अतुल यांचा दमदार आवाज ऐकून चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे. "लाख मराठ्यांची तू आग रे..." अशा शब्दांनी या गाण्याने आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
रितेश देशमुखने पोस्टमध्ये काय म्हटलंय?
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलंय -''छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा!राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.''
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी आणि हिंदी.
भव्य स्टारकास्टची फौज
दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून रितेश देशमुखने या चित्रपटात जीव ओतला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि भाग्यश्री, जेनेलिया यांसारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे शूट सिनेमॅटोग्राफर संतोष शिवन यांनी केले आहे.
प्रदर्शनाची तारीख
'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जगभरात प्रदर्शित होणार आहे. केवळ मराठीतच नाही तर हिंदीसह इतर पाच दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे.