Vaani Kapoor, AJay Devgan and Tamannah film Raid 2 Fees Instagram
मनोरंजन

Raid 2 Cast Fees | 'रेड- २'साठी अजय, रितेश, वाणीने किती घेतले पैसे? एका आयटम सॉन्गसाठी तमन्नाला मिळाले इतके कोटी

Raid 2 Cast Fees | अजय देवगन, रितेश देशमुख, वाणी कपूरने या 'रेड २' मधील कलाकारांनी किती पैसे घेतले, हे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.

स्वालिया न. शिकलगार

Vaani Kapoor, AJay Devgan and Tamannah film Raid 2 Fees

मुंबई : बॉक्स ऑफिसवर ओपनिंगलाच मोठा गल्ला मिळवून रेड २ चित्रपटाने वाहव्वा मिळवलीय. रेड-२ च्या पहिल्या दिवशीचे कलेक्शन १०.४ कोटी रुपये होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ‘रेड-२’ ने ओपनिंग डेला १८.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगन आणि रितेश देशमुख स्टारर चित्रपट 'रेड २' ने १ मे रोजी चित्रपटगृहात दाखल झाला. या क्राईम-थ्रिलरमध्ये वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. शिवाय प्रत्येक पात्राची बूमिका दमदार आहे. त्यामुळे 'रेड २' मधील कलाकारांनी या भूमिकेसाठी किती पैसे घेतले, हे जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.

अजय देवगन

एका इंग्रजी वेबसाईटनुसार, एक्टर अजय देवगनने चित्रपटाच्या बजेटची अर्धी फी वसूल केलीय. त्याने रेड २ साठी २० करोड़ रुपये घेतले आहेत. तर चित्रपटाचे बजेट ४८ कोटी रुपये सांगितले जात आहे. चित्रपटात अजय आयकर विभागाच्या एका डेप्युटी कमिश्नर अमय पटनायकच्या भूमिकेत आहे. जो भ्रष्टाचाराविरोधात अथक मोहिमेसाठी ओळखला जातो. चित्रपटाची संपूर्ण कहाणी अजय आणि रितेश म्हणजेच राजनेता दादा भाईच्या अवती भोवती फिरते.

रितेश देशमुख

रेड २ मध्ये रितेशने राजनेता दादा भाईची भूमिका साकारलीय, जो एक खलनायक आहे. त्याची नेमहमीपेक्षा अगदी वेगळी भूमिका दिसतेय. चित्रपटसाठी त्याने ४ कोटी रुपये घेतले आहेत.

वाणी कपूर

सुंदर अभिनेत्री वाणी कपूरने य़ामध्ये अजय देवगनच्या पत्नीची भूमिका साकारलीय. यासाठी तिला १ कोटी रुपये मिळाले आहेत.

तमन्ना भाटिया

तमन्ना भाटियाने चित्रपटात एक आयटम सॉन्ग केलं आहे. आटम सॉन्ग 'नशा' फॅन्सच्या पसंतीस उतरला आहे. एका गाण्यासाठी तमन्नाला एक कोटी रुपये मिळाले आहेत.

SCROLL FOR NEXT