Anant Ambani-Radhika Merchant Grand wedding functions
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी ५ स्टार हॉटेल्स तत्काळ बूक झाले आहेत Anant Ambani Instagram
मनोरंजन

Ambani Wedding : बीकेसीतील सर्व ५ स्टार हॉटेल्समध्ये बुकिंग, एका रात्रीचे भाडे १ लाख

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात लवकरच राधिका मर्चेंट सून म्हणून जाणार आहे. अनंत अंबानी - राधिका मर्चेंटचे लग्न १२ जुलैला मुंबईतील बीकेसीमध्ये जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. शाही लग्न सोहळ्यात देश- परदेशातील पाहुणे सहभागी होतील. दरम्यान, मुंबईमध्ये मोठ्या हॉटेल्सची मागणी वाढली आहे. अंबानी परिवाराच्या लग्नाच्या ठिकाणच्या सभोवताली असणाऱ्या अनेक 5 स्टार हॉटेल्सच्या रुम्स बूक झाल्याची माहित मिळत आहे.

एका रिपोर्टनुसार, अनंत-राधिकाच्या लग्नाच्या कारणास्तव मुंबईतील प्रमुख रियल इस्टेट सेंटर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सचे ५ स्टार हॉटेल्समध्ये तत्का‍ळ बुकिंग होत आहे.

५ स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका रात्रीचे भाडे लाखात

ट्रॅव्हल आणि हॉटेल वेबसाईट्सनुसार, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये दोन हॉटेल असे आहेत, जिथे सर्व रूम्स आतापासूनच बूक झाले आहेत. यातील एका हॉटेलमधील एका रुमचे रात्रीसाठीचे भाडे (१४ जुलैसाठी) ९१ हजार ३५० रुपये आहे.

सामान्यपणे ५ स्टार हॉटेलमध्ये इतके भाडे...

रिपोर्टनुसार, सामान्यपणे, या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका रात्रीसाठीचे भाडे १३ हजार रुपये असते. पण, ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईट्सवर बीकेसीच्या प्रमुख हॉटेल्स ट्रायडेंट बीकेसीमध्ये ९ जुलैसाठीचे एका रुमचे भाडे पर नाईट १० हजार २५० प्लस टॅक्स दाखवत आहे. १५ जुलैला १६ हजार ७५० प्लस टॅक्स आणि १६ जुलैला १३ हजार ७५० प्लस टॅक्स दाखवत आहे. १० जुलै ते १४ जुलैपर्यंत कोणत्याही रुम्स उपलब्ध नाहीत.

१४ जुलैपर्यंत सेलिब्रेशन

१२ ते १४ जुलैपर्यंत ग्रँड वेडिंग सेलिब्रेशनमध्ये अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे. १२ जुलैला अनंत- राधिकाचे लग्न आहे. शनिवार, १३ जुलै -शुभ आशीर्वाद कार्यक्रम आहे. रिपोर्टनुसार, रविवार, १४ जुलै रोजी रिसेप्शनचे आयोजन केलं आहे. पण, याबाबत कोणतेही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

SCROLL FOR NEXT