Radhika Apte Tusshar Kapoor Relationship Pudhari
मनोरंजन

Radhika Apte: त्या रात्री गोव्यात नेमकं काय घडलं होतं? तुषार कपूरला डेट केल्याच्या चर्चांवर राधिकाचे भन्नाट उत्तर

Radhika Apte Tusshar Kapoor Relationship: अभिनेत्री राधिका आपटेने अभिनेता तुषार कपूरसोबतच्या कथित अफेअरच्या जुन्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

पुढारी वृत्तसेवा

Radhika Apte Tusshar Kapoor Relationship: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. चित्रपटांमधील दमदार अभिनयासोबतच ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिचं नाव बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरसोबत जोडलं गेलं होतं. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. आता अनेक वर्षांनंतर राधिकाने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

राधिका आपटेने हिंदी, मराठी चित्रपटांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र, तिच्या करिअरच्या सुरुवातीला तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याच्या चर्चांना अधिक महत्त्व दिलं गेलं. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शोर इन द सिटी' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राधिका आणि तुषार कपूर एकमेकांच्या जवळ आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

इतकंच नाही, तर दोघे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्याला गेल्याच्याही बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे राधिका आणि तुषार यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, या चर्चांवर राधिकाने त्यावेळी कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता अनेक वर्षांनंतर राधिकाने या अफवेवर दिली प्रतिक्रिया

नुकत्याच Curly Tales या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत राधिकाला तिच्याबद्दल ऐकलेल्या सर्वात विचित्र अफवेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तिने तुषार कपूरसोबतच्या कथित नात्याचा उल्लेख केला.

राधिका म्हणाली, "मी तुषार कपूरला डेट करत असल्याची अफवा पसरली होती. हे ऐकून मला वाटलं, अरे, काहीतरी तरी चांगलं करा! तुषार कपूरसोबत माझं नातं असल्याची ही चर्चा अजिबात खरी नव्हती. आमच्या दोघांबद्दलही अशा अफवा पसरवल्या जात होत्या." अनेक वर्षांपूर्वी रंगलेल्या या अफवांवर तिने आता थेट भाष्य केल्याने तिची मुलाखत चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT