Dhokha Round D Corner movie  
मनोरंजन

Dhokha Round D Corner : माधवनच्या ‘धोखा राऊंड डी कॉर्नर’चा ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता आर माधवन त्याच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू करू शकला नाही. जेमतेम कमाईनंतर आता आर माधवन धोखा राऊंड डी कॉर्नर (Dhokha Round D Corner) या चित्रपटात दिसले. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. (Dhokha Round D Corner)

अभिनेता आर माधवनच्या 'धोखा राऊंड डी कॉर्नर' या नव्या चित्रपटाची रिलीज डेटही आधी जाहीर करण्यात आली होती. या चित्रपटाचा टीझर १७ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. टीझर रिलीजबद्दल माहिती देताना, निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, शेवटी, सत्य काय आहे? इथे प्रत्येक वळणावर फसवणूक आहे.

दमदार ट्रेलर रिलीज

आर माधवन आणि खुशाली कुमार स्टारर चित्रपट धोका राऊंड डी कॉर्नरचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक कुकी गुलाटी दिग्दर्शित हा चित्रपट २३ सप्टेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

आर माधवनच्या धोका राऊंड डी कॉर्नर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात आर माधवन व्यतिरिक्त खुशाली कुमार, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये आर माधवन आणि खुशाली कुमार आनंदाने त्यांचे वैवाहिक जीवन जगत असतात. मात्र, एका घटनेने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते, अशी चित्रपटाची कहाणी आहे. अपारशक्ती खुरानाने या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका साकारलीय.

आर माधवनच्या या चित्रपटाचे शूटिंग कोरोना काळात सुरू झाले होते. तसेच या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या कंपनी टी-सीरीजने केली आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे निर्माता भूषण कुमारची बहीण खुशाली कुमार देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, धोका – राऊंड डी कॉर्नर हा सस्पेन्सवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सर्वच पात्रांच्या नकारात्मक भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट शहरी जोडप्याच्या जीवनावर आधारित आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT