'पुष्पा-२'चे 3D व्हर्जन होणार रिलीज नाही  x account
मनोरंजन

Pushpa-2 Film | 'पुष्पा-२'चे 3D व्हर्जन होणार नाही रिलीज, रात्रीचे शोज रद्द

Pushpa-2 film 3D Release Date Postpone | 'पुष्पा-२'चे 3D व्हर्जन होणार नाही रिलीज, रात्रीचे शोज रद्द

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - चित्रपट 'पुष्पा २' च्या निर्मात्यांनी सांगितले आहे की, याचे 3 डी व्हर्जन या आठवड्यात रिलीज होणार नाही. ५ डिसेंबर रोजी 'पुष्पा २' थ्रा डीमध्ये रिलीज होणार नाही. केवळ 2 डी व्हर्जन रिलीज होईल. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा २ : द रूल' चे फॅन्सना प्रतीक्षा आहे. याआधी चित्रपटाचे तुफान ॲडव्हान्स बुकिंग झाले होते. 'पुष्पा' पुन्हा एकदा चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी तयार आहे. (Pushpa-2 film 3D Release Date Postpone )

'पुष्पा २' चे 3 डी व्हर्जन रिलीज होणार नाही

रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुन-स्टारर 3 डी प्रिंट व्हर्जन तयार नाही. म्हणून 'पुष्पा २' च्या निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे की, चित्रपटाचे 3 डी व्हर्जन या आठवड्यात रिलीज होणार नाही. ५ डिसेंबर रोजी 'पुष्पा २' - 3 डीमध्ये रिलीज होणार नाही. फक्त 2 डी व्हर्जन ५ डिसेंबर रोजी रिलीज होईल. त्याशिवाय निर्मात्यांनी म्हटले आहे की, चित्रपटाच्या हिंदी व्हर्जन शोज ४ डिसेंबर रोजी रात्री रिलीज होणार नाही. असे म्हटले जात आहे की 'पुष्पा २' चे 3 डी व्हर्जन १३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. (Pushpa-2 film 3D Release Date Postpone )

अल्लू अर्जुनच्या फॅन्सना झटका

रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' ची क्रेज फॅन्सच्यामध्ये प्रचंड आहे. सिनेप्रेमींनी थिएटर्समध्ये प्री-बुकिंग केले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारने 'पुष्पा २' साठी थिएटर्सची तिकिटाची किंमत वाढवण्याची परवानगी दिली आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिकिटाचे दर सरकार ठरवते आणि यासाठी दरांमध्ये बदल केवळ सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच शक्य आहे. 'पुष्पा २' चे तिकीट दर वाढवण्याच्या परवानगीसाठी अल्लू अर्जुनने आंध्र प्रदेश सरकारचे आभार मानले आहेत.

रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचा चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहात रिलीज होत आहे. पण, आंध्र प्रदेशमध्ये याचे स्पेशल प्रीव्ह्यू शोज बुधवार, ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून ३० मिनटांनी सुरू होईल. या प्रीमियर शोजसाठी सिंगल स्क्रीन्स आणि मल्टीप्लेक्स दोन्ही ठिकाणी होईल. तेलंगाणामध्ये अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या प्रीमियर शोज (बुधवार) साठी तिकिट दर १२०० रुपये आणि रिलीज नंतर सिंगल स्क्रीन्ससाठी ३५४ रुपये, मल्टीप्लेक्ससाठी ५३१ रुपये करण्याची परवानगी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT