Priyanka Chopra GlobeTrotter new look  Instagram
मनोरंजन

Priyanka Chopra GlobeTrotter | मंदाकिनी बनून येणार 'देसी गर्ल'? राऊडी लूकसह नवे पोस्टर रिलीज

Priyanka Chopra GlobeTrotter | मंदाकिनी बनून येणार 'देसी गर्ल'? राऊडी लूकसह नवे पोस्टर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

प्रियांका चोप्राच्या आगामी ‘GlobeTrotter’ चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज झालं असून तिने यात मंदाकिनीसारख्या राऊडी आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांना थक्क केलं आहे.प्रियांका यात पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात झळकणार आहे.

Priyanka Chopra GlobeTrotter new poster release

मुंबई - बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘GlobeTrotter’ या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच रिलीज झालं असून त्यात प्रियंका अगदी राऊडी आणि धाडसी अवतारात दिसत आहे. चाहत्यांनी या लूकला ‘मंदाकिनी meets मॅव्हरिक’ असं म्हणत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हटलंय प्रियांका चोप्राने?

प्रियांका चोप्राने एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात ती पिवळ्या साडीत दिसते. तिच्या हातात बंदूक असून तिने ती कुणावर तरी रोखून धरलीय. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना प्रियांकाने लिहिलं, She’s more than what meets the eye… Say hello to Mandakini. #GlobeTrotter ‘GlobeTrotter’ हा एक आंतरराष्ट्रीय अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट आहे.

ग्लोब ट्रोटरचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रियांका चोप्रा असलेले पोस्टर शेअर केले. वेलकम पीसी ऑन बोर्ड असे दिग्दर्शकाने लिहिले. त्यांनी पुढे म्हटलंय-“जागतिक स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीची पुनर्परिभाषा करणारी महिला. देसी गर्ल, पुन्हा स्वागत आहे! @priyankachopra मंदाकिनीच्या तुझ्या असंख्य छटा जगाला पाहण्याची उत्सुकता आहे. #GlobeTroter” ७ नोव्हेंबर रोजी.''

'हैदराबाद बिर्याणी जगात सर्वात उत्तम'

प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या चाहत्यांशी ऑनलाइन संवाद साधला, जिथे बहुतेक प्रश्न तिच्या आगामी चित्रपट 'SSMB29' बद्दल होते ज्यात एसएस राजामौली आणि महेश बाबू आहेत. फॅन्स तिला तेलुगू चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा तिचा अनुभव आणि तिने हैदराबादची प्रसिद्ध बिर्याणी चाखली आहे का? हे जाणून घेण्यास उत्सुक होते. यावर प्रियांका म्हणाली, "मला चित्रपटात यायला अजून सुरुवात आहे, पण ती अदिरी पोयंडी (आश्चर्यजनक) आहे! तसेच, हैदराबादची बिर्याणी जगातील सर्वोत्तम आहे."

मंदाकिनीच्या भूमिकेत तिचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित झाला. तिने पिवळ्या साडीत आणि हातात बंदूक धरलेली होती. जेव्हा एका चाहत्याने विचारले की ती येणाऱ्या मोठ्या कार्यक्रमासाठी पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाख घालणार आहे का, तेव्हा तिने गोष्टी रहस्यमय ठेवल्या आणि फक्त उत्तर दिले, "श्श. १५ तारखेला बरेच काही उघड होईल."

‘सिटाडेल’ आणि ‘लव्ह अगेन’नंतर प्रियंका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहे. सध्या या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा झालेली नसली तरी ट्रेलर लवकरच येणार असल्याचं संकेत प्रियांकाने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT