गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचे अकाली निधन झाले. अनेक मालिकांमधून प्रियाने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. इतक्या कमी वयात प्रियाच्या अकाली जाण्याने तिच्या चाहत्यांसोबत सहकारी कलाकारांनाही मोठा धक्का बसला.
आता प्रियाला जाऊन जवळपास एक महिना झाला आहे. यानंतर एक महिन्यानंतर प्रियाचा नवरा आणि अभिनेता शंतनू मोघे सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. शंतनूने अवघड काळात आधार देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. (Latest Enterttainment News)
शंतनू आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ ही कृतज्ञतेची पोस्ट आहे. त्यांच्यासाठी ज्यांनी मला धीर देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाचा वापर केला जसे की कॉल, ई-मेल, व्हॉट्सअॅप्स, एक्स (X), इंस्टाग्राम, फेसबुक. आमच्या नंबर वन प्रिया मराठे साठी कुटुंब आणि मित्रांनी, चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी, परिचितांनी आणि अनोळखी व्यक्तींनी भावना, दुख आणि काळजी अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून व्यक्त केल्या त्या सगळ्यांसाठी आभार.
या सगळ्या आशीर्वादाने आमच्या माणुसकीवरचा विश्वास वाढला आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.
आज एक महिना झाला...
व्यक्तिगत दुःख आणि वेदना शब्दांत मांडणे शक्य नाही... प्रेमळ, सकारात्मक आणि नितळ व्यक्तीकडून असा अकाली आणि दुर्दैवी निरोप घेणे अत्यंत वेदानादायी आहे.
तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली कशी कामातून, कलेतून, प्रेमातून, काळजीने, दयाळूपणाने, वागणुकीतून, आचरणातून, संवेदनशीलतेतून, समजूतदारपणातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वरील सर्व गोष्टींशी जुळणाऱ्या सकारात्मकतेतून. चांगल्या-वाईट काळात नेहमी आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सगळ्यांचे आभार. तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि शुभेच्छा.
देवांना इशारा!.. तिची काळजी घेण्यामध्ये, तिच्यावर प्रेम करण्यामध्ये तुमच्याकडून आणखी एकही चूक माफ केली जाणार नाही.
माझी एंजल.. आपण परत भेटेपर्यंत..
शंतनूच्या पोस्टवर इतर सहकलाकारांनी कमेंट केल्या आहेत. प्रार्थना बेहरे म्हणते, तिची रोजच आठवण येते. तर राणूअक्का साकारणाऱ्या अश्विनी महांगडेनेही शंतनूच्या पोस्टवर आबासाहेब अशी कमेंट केली आहे. तर अमोल कोल्हे यांनीही 'शूर छाव्याचा शूर आबा' ही कमेंट करत शंतनूला धीर दिला आहे.