Customs Rain on Prithviraj Sukumaran-Dulkar Salman House
नवी दिल्ली - लक्झरी कार तस्करी प्रकरणात मल्याळम स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमान यांच्या घरांवर कस्टम्सने छापे टाकले. हे छापे एका कारवाईचा एक भाग आहेत, ज्यामध्ये बेकायदेशीर आयात आणि करचुकवेगिरीमध्ये सहभागी असलेल्या तथाकथित नेटवर्कला लक्ष्य करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे आयात केलेल्या प्रीमियम वाहनांवरून ही कारण्यात आली आहे. रिपोर्टनसार, भूतानमधून १०० हून अधिक प्रीमियम वाहनांच्या कथित बेकायदेशीरपणे केरळमध्ये आयातीवरील कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले, यामध्ये प्रामुख्याने अभिनेते आणि उद्योगपतींचा समावेश आहे.
पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमान हे दोघेही केवळ मल्याळमच नव्हे तर संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टीतील आघाडीचे चेहरे मानले जातात. या अचानक घडलेल्या कारवाईमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कस्टम विभागाने मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमान यांच्या कोच्ची येथील घरावंर कारवाई करण्यात आली. या मोहिमेला 'नुमकूर' (वाहन) असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेचेा उद्देश टॅक्स चोरी आणि अवैध गाड्यांच्या आयातीत असणाऱ्यांना पकडणे आहे.
रिपोर्टनुसार, कस्टम्सच्या विशेष पथकाने केलेल्या छाप्यात दोन्ही अभिनेत्यांच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि कार खरेदीशी निगडित काही महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे समजते. मात्र, या कलाकारांचा या रॅकेटशी थेट संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमार यांच्या कोच्चीतील थेवारा येथील घरात छापेमारी सुरु आहे. असेही म्हटले जात आहे की, अधिकारी या अभिनेत्यांच्या तिरुवनंतपुरममध्येही तपास करतील. तर दुलकर सलमानच्या पनमपिल्ली नगर येथील घरावर देखील कारवाई सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, लक्झरी गाड्या हिमाचल प्रदेशात आणण्यात आली होती. तिथे बेकायदेशीरपणे वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. पुढे सेलिब्रिटी, उद्योगपतींना अधिक किंमतीत विकली जात होती.