Prateik Babbar says why his father Raj Babbar and family were not present his wedding  pudhari
मनोरंजन

Prateik Babbar Big Reveal about Raj Babbar | प्रतीक बब्बरने लग्नाला वडिलांना का बोलावलं नाही? केला मोठा खुलासा

Prateik Babbar | ''मी आणि पत्नीने घेतलेला निर्णय सर्वोत्तम'', राज बब्बरना लग्नासाठी आमंत्रण का नाही...प्रतीकने केला खुलासा

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : अभिनेता प्रतीक बब्बरने त्यांच्या अलिकडच्या लग्नाला त्यांचे वडील राज बब्बर आणि त्यांच्या कुटुंबाला आमंत्रित न करण्यामागील कारण सांगितले. त्याच्या दिवंगत अभिनेत्री, आई स्मिता पाटील यांच्या घरी झालेला लग्नाचा हा समारंभ अत्यंत प्रतीकात्मक होता - आईची इच्छा म्हणून तिच्या स्वप्नाच्या घरामध्ये लग्न सोहळा पार पडल्याचे त्याने म्हटले आहे.

प्रतीकने १४ फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत विवाह केला. प्रतीकने वडील राज बब्बर आणि त्यांची पहिली पत्नी नादिरा यांना आणि त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्याला निमंत्रित केलं नाही. हे वृत्त समजल्यानंतर सावत्र भाऊ आर्य बब्बर आणि बहिण जुही बब्बरने नाराजी व्यक्त केली. आता प्रतीक बब्बरने खुलासा केला की, त्याने वडील आणि त्याच्या परिवाराला अखेर लग्नाला का बोलावलं नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, प्रतीकने सांगितलं की, ''त्याचा निर्णय परिवारात फूट पाडण्याचा नव्हता, तर त्याच्या आईच्या स्मृतीचा आदर करण्याचा होता. तो कोणालाही नाकारण्याचा नव्हता... ती योग्य गोष्ट होती..परंतु मला कोणताही पश्चात्ताप नाही. हा माझ्या पत्नीने आणि मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता."

स्मिता पाटील यांच्या घरी पार पडला होता लग्न सोह‍ळ‍ा

प्रतीकने सांगितलं की, त्याचे लग्न एक खासगी सोहळा होता. आणि लग्नविधी त्याची आई स्मिता पाटील यांच्या घरी झाला. माझी आणि सावत्र आई नादिरा बब्बर यांच्यात भूतकाळातील वाद पाहता वडील आणि नादिरा यांच्या परिवारातील सदस्यांना बोलावणे योग्य ठरले नसते. त्याचा कोणत्याही वैयक्तिक मतभेदाशी काहीही संबंध नव्हता. हेच कारण होतं की, त्यांना लग्नाला आमंत्रण दिले नाही.

सूत्रांनुसार, प्रतीकने आधी परिवारासाठी एक वेगळे नियोजन केले होते. पण नंतर सावत्र बहिण-भाऊ यांच्या प्रतिक्रियेनंतर त्याने निर्णय बदलला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT