पुढारी ऑनलाईन डेस्क ; हिंदी चित्रपटांचे अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीपेक्षा कमी नाही. दोघांच्याही सिनेकरिअरमध्ये चित्रपटांबद्दल जितकी चर्चा झाली, तितकं त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. कारण आहे, राज-स्मिता यांची लव्हस्टोरी. स्मिता यांच्या आईला त्यांचं हे नातं मान्य नव्हतं.
अधिक वाचा – द फॅमिली मॅन -२ : वनिता खरातप्रमाणेच शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर बॉडीशेमिंगवरून टीका
स्मिता एक वृत्तनिवेदिका म्हणून काम करत होत्या. चित्रपटात आल्यानंतर यशाचे शिखर गाठत असताना 'भीगी पलकें' चित्रपटादरम्यान राज बब्बर आणि स्मिता पाटील प्रेमात पडले. राज यांचा विवाह नादिरा जहीर यांच्याशी झाला होता. राज हे विवाहित होते. हे माहित असतानाही स्मिता आणि राज यांच्यात नवं नातं निर्माण झालं.
राज बब्बर यांच्याप्रमाणेच नादिरा यांनीदेखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पदवी घेतली होती. पहिली पत्नी असतानाही राज हे स्मिताच्या प्रेमात पडले होते.
अधिक वाचा – Happy B'day मास्टर विजय : सेटवर भेटायला आलेल्या तरुणीशी ३ वर्ष अफेअर आणि…
असं म्हटलं जातं की, राज बब्बर त्यावेळी स्मितासाठी काहीही करायला तयार होते. ऐंशीच्या दशकात दोघेही एकत्र राहू लागले. काही काळानंतर राज आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले. यानंतर त्यांनी स्मिता यांच्याशी लग्न केलं. नादिरा यांचा संसार मोडल्याचा आरोपही स्मिता यांच्यावर झाला.
स्मिता पाटील आई झाल्या. प्रतीक बब्बरचा जन्म झाल्यानंतर वयाच्या ३१ व्या वर्षी १३ डिसेंबर १९८६ ला त्यांचं निधन झालं. स्मिता यांचं निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सुहासिनीप्रमाणे सजवण्यात आलं होतं, मेकअप करण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवाला मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतने एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'स्मिता यांनी मृत्यूनंतर ही इच्छा जाहीर केली होती की, आपल्या मृत्यूनंतर एखाद्या सुहासिनीप्रमाणे आपल्याला तयार करण्यात यावं.'
अधिक वाचा- महेश मांजरेकरांची नवी घोषण, 'बिग बॉस मराठी' चे ३ रे पर्व लवकरचं तुमच्या भेटीला
राज बब्बर यांची तीन अपत्ये
राज यांना पहिल्या पत्नीची जूही आणि आर्य ही दोन अपत्ये तर स्मिता यांचा प्रतीक बब्बर हा मुलगा आहे. स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर पुन्हा आपल्या पहिली पत्नी नादिराकडे परतले.