मनोरंजन

Cannes 2022 : ग्रीन पोलका डॉटमध्ये दीपिकाचे निखळ हास्य (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कान्स फिल्म फेस्टिव्हल ( Cannes 2022 ) सुरू झाला आहे. या महोत्सवात आपल्या सौंदर्याने थक्क करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, तमन्ना भाटिया, पूजा हेगडे, हिना खान, मीरा कपूर यांनी आपल्या सौंदर्यासोबत नवनविन फॅशनची जादू दाखवली. ७५ व्या कान्स महोत्सवात ज्यूरी म्हणून दीपिका भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे. याच दरम्यान दीपिकाचे एकामागून एक हॉट लूक्स समोर येत आहेत.

सध्या दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes 2022 ) आहे. तिने आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाऴ केलं आहे. रेड कार्पेटवरून तिचे वेगवेगळे लूक समोर येत आहेत. आता दीपिकाने ग्रीन कलरचा पोलका डॉट ड्रेस परिधान करून चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यासोबत तिच्या निखल हास्याने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. यावेळी तिने हाई हिल्स, कानात रिंग्स, हातात वॉचसह मेकअप केला आहे. यातील खास म्हणजे, तिने विशेष करून जमिनीवर बसून फोटोशूट केलं आहे.

याशिवाय तिने कान्सच्या रस्त्यावर देखील फोटोशूट केलं आहे. यात पिंक कलरच्या स्कर्टसोबत पांढऱ्या रंगाचा शर्टमध्ये सुंदर दिसतेय. या फोटोत खास करून दीपिकाच्या शर्टवर वेगवेगळे फोटो पाहायला मिळताहेत. आणखी काही फोटोत ती बेंज कलरच्या ओव्हर कोट आणि फ्लोरल शर्टमध्ये आणि ब्लॅक रंगाच्या बॉडी कोन ड्रेसमध्ये दिसली. सोशल मीडियावर शेअर झालेल्या सर्व फोटोत दीपिका खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत होती. तिच्या वेगवेगळ्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ घातली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक स्टार्संनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात 'Khubsurat ?' , 'Pretty pretty ??❤️', 'Gorgeous ❤️❤️', 'Queen of green?', 'So beautiful', 'SO PRETTY OMG ???', 'nice color ???', 'My Jaan ??', 'sweetheart ???', 'Queen of Cannes looks ?', 'Woahhhh', 'Black beauty'. यासारख्या भरभरून कॉनेम्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी रेड हार्ट, ग्रीन हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहे. दीपिका सोशल मीडियानवरप नेहमी सक्रिय असून आपले अपडेटस् देत असते.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT