Phir Aayi Hasseen Dillruba Trailer  Taapasee Pannu Instagram
मनोरंजन

Phir Aayi Hasseen Dillruba Trailer: फिर आई हसीन दिलरुबामध्ये गुंतागुंतीचा ठरणार प्रेमाचा खेळ

तापसी-विक्रांत मेस्सी, जेमी शेरगीलच्या फिर आई हसीन दिलरुबाचा ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुन्हा हसीन दिलरुबा मोठ्या पडद्यावर येण्यासाठी तयार आहे. यावेळी प्रेमाचा खेळ आणखी थोडं वाकडं होणार आहे. आता चित्रपट 'फिर आई हसीन दिलरुबा'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये आप तापसी पन्नू, विक्रांत मेसी, सनी कौशल एका गुंतागुंतीच्या प्रेम कहाणीसोबत सस्पेन्स घेऊन येणार आहेत. 'फिर आई हसीन दिलरुबा' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे

२०२१ मध्ये जेव्हा नेटफ्लिक्सवर 'हसीन दिलरुबा' चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हा प्रेक्षकांची खूप उत्सुकता होती. चित्रपटामध्ये प्रेम कहाणी सोबत मिस्ट्री देखील होती. हा चित्रपट खूप पसंतीस उतरला होता. आता पुन्हा हसीन दिलरुबाचा प्रेमाचा खेळ रंगाणार आहे.

फिर आई हसीन दिलरुबामध्ये नवे ट्विस्ट

तापसी पन्नू -विक्रांत मेसी स्टारर चित्रपट 'हसीन दिलरुबा' मध्ये अभिनेत्री राणीला तिचा पती ऋषभ सक्सेना उर्फ रिशु (विक्रांत मेसी) आणि चुलत भाऊ नील (हर्षवर्धन राणे) सोबत पाहण्यात आलं होतं. साधा-सरळ रिशु आपल्या पत्नीचे अफेअर पाहिल्यानंतर संतापतो. पण, जे स्वप्नातदेखील विचार केला नसेल ते घडतं. रिशु आणि रानीने मिळून षड्यंत्र रचलं आणि नीलला आपल्या मार्गातून हटवलं होतं. पण, त्याची खूप मोठी किंमत दोघांना मोजावी लागली होती. पण आताच्या .'फिर आई हसीन दिलरुबा' सिक्वेलमध्ये नवं ट्विस्ट तेथून सुरु होणार आहे, जिथून मागील चित्रपट संपला होता, तिथून सीक्वेलची सुरुवात होणार आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात इन्स्पेक्टर किशोरच्या राणीची चौकशीपासून होते. राणीला विचारलं जात आहे की, तिचा पती रिशु कुठे आहे. राणी आणि रिशु लपूनछपून भेटत आहेत. पुढे काय घडतं हे चित्रपट पाहिल्यानंतर समजेल.

'फिर आई हसीन दिलरुबा' चे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केलं आहे. त्याची कहाणी कनिका ढिल्लनने लिहिली आहे. तापसी पन्नू, विक्रांत मैसी, सनी कौशल, जिमी शेरगिल आणि आदित्य श्रीवास्तव स्टारर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ९ ऑगस्टला स्ट्रीम होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT