Peddi Director Buchi Babu Apologise over janhvi kapoor scenes  pudhari photo
मनोरंजन

Peddi Director Buchi Babu Sana Apologies|'मला माहिती नव्हतं की लोक इतकं नकारात्मक दृष्टीने पाहतील', जान्हवी कपूरच्या सीन्सवर पेड्डीच्या दिग्दर्शकाची माफी

Peddi Director Buchi Babu Apologise |मला माहिती नव्हतं की लोक इतकं नकारात्मक दृष्टीने पाहतील, जान्हवी कपूरच्या सीन्सवर 'पेड्डी'च्या दिग्दर्शकाची माफी

स्वालिया न. शिकलगार

‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या काही दृश्यांवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर दिग्दर्शक बुची बाबू यांनी माफी मागितली आहे. प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रियांमुळे आपण आश्चर्यचकित झालो असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे.

साऊथ स्टार राम चरणची मुख्य भूमिका असलेला पेड्डी चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरला चुकीच्या पद्धतीने सादर केल्यामुळे दिग्दर्शकाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. दिग्दर्शक बुची बाबू यांनी 'पेद्दी'मधील जान्हवी कपूरच्या सादरीकरणावर झालेल्या सार्वजनिक टीकेची दखल घेत म्हणाले की, या दृश्यांकडे प्रेक्षक इतक्या नकारात्मक दृष्टीने पाहतील, याची आपण कल्पनाही केली नव्हती, असे त्यांनी सांगितले.

'पेड्डी' (Peddi) चित्रपटातील जान्हवी कपूरच्या सादरीकरणावर झालेल्या टीकेला प्रतिसाद देत ते म्हणाले, जान्हवी कपूरच्या अति-कामुक सादरीकरणावरून टीका झाल्यानंतर आम्ही भविष्यात पुन्हा असे होणार नाही, याची काळजी घेऊ. त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले की, यात बदल केले जातील.

'एक्स' अकाऊंटवर ते म्हणाले, त्यांच्या टीमने प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणल्या. त्या आम्ही गांभीर्याने घेतल्या आहेत.

'पेड्डी'च्या दिग्दर्शकाची माफी

आपल्या माफीनाम्यात बुची बाबू यांनी लिहिले, "चित्रपटाने मनोरंजन केले पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे आणि प्रेक्षकांशी नाते जोडले पाहिजे. यामुळे कोणालाही अस्वस्थ किंवा अपमानित वाटू नये. विशिष्ट दृश्यांबाबतच्या प्रतिक्रिया ऐकल्या गेल्या आहेत आणि त्यांची दखल घेतली गेली आहे. कोणत्याही स्त्री पात्राचे वस्तूकरण करणे किंवा तिचा अनादर करणे हा आमचा हेतू कधीच नव्हता."

बुची बाबू म्हणाले की, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनंतर संबंधित भागांमध्ये बदल करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. चित्रपट निर्मितीमध्येही बदल होणे गरजेचे आहे. प्रतिक्रियांचा आढावा घेतल्यानंतर, आम्ही संबंधित भागांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT