'Peddi' BO collection updates  pudhari photo
मनोरंजन

'Peddi' BO collection day 25 |'पेड्डी'च्या कमाईत रविवारी उभारी; २५ दिवसांत जगभरात इतक्या कोटींचा गल्ला

'Peddi' BO collection day 25 |'पेड्डी'च्या कमाईत रविवारी उभारी; २५ दिवसांत जगभरात इतक्या कोटींचा गल्ला

स्वालिया न. शिकलगार

'पेड्डी'ने प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी, रविवारी बॉक्स ऑफिसवर चांगली उभारी घेतली. वीकेंडमुळे प्रेक्षकांची संख्या वाढल्याने चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. २५ दिवसांत देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर चित्रपटाने उल्लेखनीय कमाई केली असून बॉक्स ऑफिसवरील त्याची घोडदौड कायम असल्याचे दिसून येत आहे.

Ram Charan film Peddi worldwide collection

राम चरणचा स्पोर्ट्स-ॲक्शनपट 'पेड्डी' रिलीज होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहे. आता चौथ्या आठवड्यातही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. रविवारी सुट्टीचा फायदा या चित्रपटाला झाल्याने कमाईत पुन्हा वाढ झाली आहे. मागील काही दिवसाच्या तुलनेत रविवारी या चित्रपटाने अधिक कमाई केलीय.

२५ व्या दिवशी 'पेड्डी'ने भारतात १.०४ कोटी रुपयांची नेट कमाई केली. याआधी २४ व्या दिवशी चित्रपटाने ८० लाख रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे एका दिवसात जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

यासह चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई २४०.१४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर देशांतर्गत ग्रॉस कमाई २८३.९५ कोटी रुपये झाली आहे. परदेशातील प्रदर्शनातून चित्रपटाने ५२.९० कोटी रुपयांचा ग्रॉस व्यवसाय केला असून, जगभरातील एकूण कमाई आता ३३६.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

चित्रपटाच्या कमाईत तेलुगू पट्ट्यातील सर्वाधिक कमाई आहे. रविवारी तेलुगू व्हर्जनने १.०३ कोटी रुपयांची कमाई केली, तर हिंदी पट्ट्यात १ लाख रुपयांची भर पडली. दरम्यान, समंथा रुथ प्रभूचा 'मा इंटी बंगारम'हाही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने दहाव्या दिवशी भारतात ५.३० कोटी रुपयांची नेट कमाई केली.

चित्रपटाची एकूण कमाई ४८.२५ कोटी रुपयांवर, तर देशांतर्गत कमाई ५५.८६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७८.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT