sangram singh and payal  
मनोरंजन

लग्नाआधी पायल रोहतगी-संग्राम सिंह यांचे रोमँटिक फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पायल रोहतगी तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ती तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. प्रत्यक्षात दोघेही ९ जुलै रोजी सात फेरे घेणार असल्याची माहिती समोर आलीय. पायल ९ जुलै रोजी आग्रा येथे संग्रामसोबत सात फेरे घेणार आहे. त्याआधी लग्नाच्या फंक्शनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच तिचा मेहंदी सेरेमनी झाला. हातावर संग्राम नावाची मेहदी काढलेली दुल्हनिया पायल खूपच क्यूट दिसत होती.

९ जुलै रोजी गाठ बांधण्यापूर्वी पायलने तिच्या भावी जोडीदारासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पायलने स्वतः तिच्या सोशल मीडिया हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.

खरंतरं हे रोमँटिक फोटो पायल आणि संग्रामच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे आहेत. ज्यात दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसताहेत. पायल रोहतगी आणि संग्राम सिंह गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. आता दोघेही ९ जुलै, २०२२ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. पायल आणि संग्राम आग्रा येथील ८५० वर्ष जुन्या मंदिरात सात फेरे घेतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT