Pawandeep Accident
नवी दिल्लीः इंडियन आयडॉल १२ या गायन स्पर्धेचा विजेत पवनदीप राजन याचा ५ मे रोजी कार ॲक्सिडंट झाला होता. मित्राबरोबर तो कारने उत्तराखंडकडून दिल्लीला येत होता. यावेळी राहूल नावाचा चालक कार चालवत होता त्याला डुलकी लागल्याने कारचा अपघात झाला होता. रात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला होता. त्याच्यावर सध्या नोएडातील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आता त्यांच्या तब्येतीबाबत त्याच्या टिमने माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की पवनदीप यांच्यावर काल ३ ऑपरेशन्स करण्यात आली आठ तास ही ऑपरेशन्स चालली होती. त्यामुळे तो अजूनही आयसीयूमध्येच उपचार घेत आहे.
इंडियन आयडॉलच्या १२ व्या सिझनमध्ये आपल्या गायकीने तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अनेकांना त्याच्या आवाजाची भूरळ पडली आहे. अशातच त्याच्या अपघाताची बातमी समोर आल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.
आता त्याच्या टीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याच्या तब्येतीची अपडेट दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहले आहे की ‘सकाळी लवकर त्याच्यावर ऑपरेशन सुरु केले ते आठ तास चालले यामध्ये त्याच्यावर ३ सर्जरी करण्यात आल्या’
पवनदीप राजन याची प्रकृती आता हळू हळू सुधारत असल्याची माहीती समोर येत आहे. पवनदीपवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहीती दिली की तो हळूहळू रिकव्हर होत आहे. त्याच्या फॅन्सनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच त्याच्या टिमने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
पवनदीप उत्तराखंडकडून नवी दिल्ली कडे येत होते. लखनऊ-दिल्ली हायवेवर रविवार रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली. गायक पवनदीप राजन आणि त्याच्यासोबत मित्र अजय महर, ड्रायव्हर राहुल जखमी झाले. पवनदीप उत्तराखंडमधील चंपावत येथील राहणारा आहे. तेथूनच तो दिल्ली येथे जात होता. हायवेवर थांबलेल्या कंटेनरमध्ये त्याची कार पाठीमागून घुसली.
आज पवनदीपचे लाखोंच्या घरात फॅन आहेत. सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकूनही ते चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. इंडियन आयडॉलच्या १२ व्या सिझनमध्ये सहभागी झाल्यावर त्याला खरी प्रसिद्धी मिळाली. तसेच या शो चा तो विजेताही ठरला होता. इन्स्टावर त्याचे १७ लाख फॉलोअर्स आहेत.