पवन सिंग आणि ज्योती सिंह  pudhari
मनोरंजन

Pawan Singh Jyoti Singh: माझे पती एका दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये राहतात; या प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचे खळबळजनक आरोप

पत्नी ज्योती अलीकडेच त्यांना भेटायला लखनौ इथे गेल्या होत्या

अमृता चौगुले

प्रसिद्ध भोजपुरी सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेता गायक पवन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्थात यावेळी कारण कोणता नवीन प्रोजेक्ट नाही तर त्यांची पत्नी ज्योति सिंह आहे. पवन यांची पत्नी ज्योती अलीकडेच त्यांना भेटायला लखनौ इथे गेल्या होत्या. पण तिथे त्यांची आणि पवनची भेट झाली नाही. याउलट पवनने त्यांना पोलिस बोलावून घालवून दिले. (Latest Entertainment News)

सध्या पवन आणि ज्योती यांच्यात सगळेच काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. पण लखनौच्या घरी घडलेल्या प्रकारानंतर आणि यानंतर ज्योती यांच्या लाईव्ह येण्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण या लाईव्हमध्ये ज्योतीने पवन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जाणून घेऊया काय आहे नेमके प्रकरण?

ज्योती आणि पवन यांच्या वैवाहिक जीवनात सध्या काहीसे वादळ सुरू आहे. ऑगस्टमध्येही ज्योती यांनी एक मोठी पोस्ट शेयर केली होती. यामध्ये तिने पवनसोबतच्या नात्याबाबत बरेच काही बोलले होते. आता ज्योती पवनला भेटायला लखनौ येथील घरी गेल्या होत्या.

व्हीडियोमध्ये ज्योती सांगताना दिसतात की मी जनतेच्या सांगण्यावरून घरी आले आहे. पण तिथे ते नाही मिळाले तर उलट मला पोलिस अटक करायला आले.

ज्योती म्हणतात, ‘ तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून मी पवनजीच्या घरी आले आहे. त्यांनी माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मी फक्त तुमच्या सांगण्यावरून इथे आले आहे. मी इथे त्यांची पत्नी म्हणून आले आहे. पहा पोलिस मला न्यायला आले आहेत.

मी आता पोलिस स्टेशनला जात आहे. आता तुम्हीच निर्णय घ्या, मला न्याय कसा मिळेल? जर मला न्याय मिळाला नाहीतर मी याच घरात विषप्राशन करेन.’

यानंतर ज्योती यांनी पुन्हा पवन यांच्यावर आगपाखड केली. त्यापुढे म्हणतात, ‘हे समाजाची सेवा करणार? हे पवन सिंह समाजाची सेवा करणार? ज्याने आपल्या पत्नीला घराबाहेर काढण्यासाठी पोलिस बोलावले आहेत? निवडणूक होती तोवर पत्नीला प्रचाराला बोलावून माझा वापर केला गेला. त्यानंतर एका दुसऱ्या मुलीला घेऊन हॉटेलमध्ये गेले. सगळे मला विचारू लागले की मी परत का गेले? पण पवनजी दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये असताना मी पत्नी म्हणून हे सहन करणे अशक्य आहे.’

पवनसिंह बिहारमधील आगामी निवडणूक लढवणार?

पवनसिंह पुन्हा एकदा बीजेपीमध्ये जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ते बिहारची निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT