पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) चा समारोप झाला. ११ ऑगस्ट, २०२४ रोजी झाले. या खास दिनी हा समारोह आणखी खास बनवण्यासाठी टॉम क्रुझने एन्ट्री घेतली. सर्वांनीच आपापल्या अंदाजात या कार्यक्रमाला आणखी शानदार बनवले. पण, नंतर टॉम क्रुझने आपल्या स्टंटने सर्वांना आश्चर्यचकित केलं. टॉम न केवळ आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जात नाही तर स्टंटसाठीदेखील ओळखले जातात. त्याने पॅरिस ऑलिम्पिकच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये असे स्टंट केले की, पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याचे स्टंट पाहून तुम्हीही दंग राहाल.
टॉम क्रुझला सिमोन बाईल्स आणि लॉस एंजिल्सच्या मेयर करेन बासने क्रुझला झेंडा दिला. अमेरिकेला हा झेंडा घेऊन जाण्यासाठी टॉमकडे ही मोठी जबाबदारी होती.
रिपोर्टनुसार, हे कन्फर्म झाले आहे की, येणाऱ्या वर्षात २०२८ मध्ये ऑलिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये होईल. या गोष्टीमुळे अमेरिका खुश आहे। क्रुझने एक्सवर लिहिलं, ‘धन्यवाद, पॅरिस! आता एलएसाठी रवाना झालोय.’
आधीच रेकॉर्ड करण्यात आलेल्या क्लिपमध्ये, क्रुझ शहरातून मोटारसायकलवरून जात विमानात जातो. आणि मग लॉस एंजिल्समध्ये हॉलीवूड साईनच्या टॉपवर पोहोचतो. ऑलिम्पक रिंग्स दाखवण्यासाठी ते तयार करण्यात आले होते.