मुंबई - परेश रावल स्टारर आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. संगमरवराच्या भिंतीमागे लपलेले रहस्य, ताजमहलच्या २२ बंद खोल्यांचे रहस्य, मकबरा की मंदिर यासारखे मुद्दे चित्रपटाची कहाणी आहे. त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता परेश रावल पुन्हा एकदा एका धडाकेबाज भूमिकेत झळकणार आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘द ताज स्टोरी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. कारण या चित्रपटाची कथा ताजमहल आणि त्याच्या मागील रहस्यांवर आधारित आहे.
ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की, एक संशोधक ताजमहलच्या भिंतीमागे आणि २२ बंद खोल्यांमध्ये लपलेलं सत्य शोधत आहे. तो विचारतो – “हा खरोखरच मकबरा आहे का की पूर्वीचं शिवमंदिर?” याच संवादामुळे ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘मंदिर की मकबरा’ हा वाद रंगला आहे.
परेश रावल मुख्य भूमिकेत आहेत. ताजमहलचे गाईड विष्णु दास यांची भूमिका साकारत आहेत. अशा ऐतिहासिक स्मारकाच्या उत्पत्तीवर प्रश्न उपस्थित होता आणि त्याच्या निर्मितीची सत्य जाणून घेण्यासाठी चचाणीची मागणी करतात. 'द ताज स्टोरी' विवादित विषयाच्या कारणामुळे प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. ट्रेलरमध्ये परेश रावल ताजमहलच्या खाली लपलेल्या २२ खोल्यांचे आणि तेथील उपलब्ध गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात.
ट्रेलरची सुरुवात एक हिंदू स्थानिक गाईडच्या रूपात परेश रावल यांचे आपला ताजमहल आपले मंदिर असे म्हणण्याने होते. यानंतर ते प्रश्न उपस्थित करतात की, हे स्मारक वास्तवात मुगल बादशाह शाहजहांद्वारा बनवण्यात आलेला मकबरा आहे की एक प्राचीन मंदिर. हे प्रकरण न्यायालयात पर्यंत पोहोचते. तिथे रावल स्मारकाची डीएनए परीक्षण करण्याची मागणी करतात. ट्रेलरमध्ये जाकिर हुसैन देखील दिसतात.
यूट्यूबवर चित्रपटाच्या लॉगलाईनमध्ये लिहिले आहे- 'संगमरवरच्या भिंतीच्या मागे अशी एक कहाणी लपली आहे. इतिहास काय सांगायला विसरला...रहस्य, वाद आणि गुपिते यांची कहाणी.' 'द ताज स्टोरी' भोवतीचा सर्वात मोठा वाद हा चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमुळे निर्माण झाला होता. ज्यामध्ये परेश रावल यांना ताजमहालचा घुमट उचलताना दाखवले होते. निर्मात्यांनी ते एक प्रतीकात्मक दृश्य म्हणून वर्णन केले होते, परंतु पोस्टरवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी म्हटले की यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. तर काही नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला. अनेक युजर्सनी लिहिलं, 'हे भगवान, परेश रावल यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आणखी एकाने लिहिलं- धार्मिक द्वेष पसरवला जात आहे. तिसऱ्या नेचकऱ्याने लिहिलं 'तुमचा सन्मान करतो. पण काही पैशांसाठी हे सर्व का?' 'द ताज स्टोरी' ३१ ऑक्टोबर रोजी रिलीज होईल.