Paresh Rawal confirms will enter in hera pheri 3  Instagram
मनोरंजन

Hera Pheri 3 | दुरावा मिटला! परेश रावल यांची 'हेरा फेरी-३' मध्ये एन्ट्री कन्फर्म; अक्षय कुमारला ११ लाख...

Paresh Rawal Hera Pheri 3 | हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात; परेश रावल यांनी हेरा फेरी-३ मध्ये कन्फर्म केली एन्ट्री;

स्वालिया न. शिकलगार

Paresh Rawal Confirms Return to Hera Pheri 3 Returning 11 Lakh Rs to Akshay Kumar

मुंबई - अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारला ११ लाख रुपये परत दिल्यानंतर हेरा फेरी ३ मध्ये आपली वापसी होणार असल्याचे सांगितले आहे. आम्हाला स्वत:लाच हे सर्व ठिक करायचं होतं, असे त्यांनी म्हटलं. हेरा फेरा ३ मधून परेश रावल यांना बाहेर काढल्यानंतर अक्षय कुमारच्या प्रोडक्शन कंपनीने त्यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला होता.

हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात

आता परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत चित्रपटांमध्ये वापसी केली आहे. काही दिवसांपूर्वी क्रिएटिव्ह डिफरेन्सचे कारण सांगत परेश रावलने चित्रपट हेरा फेरी ३ सोडला होता, ज्यामुळे फॅन्स खूप निराश होते. आता अभिनेते हेरा फेरी ३ मध्ये वापसी करत असल्याचे कन्फर्म केले आहे. त्यांची इच्छा आहे की, सर्व जण एकत्र येऊन मेहनत करावी.

परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादावर प्रश्न उपस्थित केले होते. त्या उत्तरादाखल ते म्हणाले, 'नाही कंट्रोव्हर्सी काही नाही मला वाटतं की, जेव्हा एखादी गोष्ट लोकांना इतकी आवडते ती तर एक्स्ट्रा केयरफुल राहायलं लागतं. ऑडियन्सच्या प्रती आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत. ऑडियन्सने तुमचं खूप कौतुक केलं आहे. तुम्ही या गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही.

परेश यांना विचारण्यात आलं ती, काय आता ते चित्रपटात दिसतील? यावर ते म्हणाले, 'आधीही येणारच होता. पण आम्हाला स्वत:ला आणखी उत्तम बनायचं होतं. अखेरीस, सर्व खूप क्रिएटिव्ह आहेत. मग ते प्रियदर्शन असो वा अक्षय असो वा सुनील. ते माझे अनेक वर्षे मित्र आहेत.'

चित्रपट सोडल्यानंतर अक्षयने पाठवली होती कायदेशीर नोटिस

खरंतर, परेश रावल हेरा फेरी ३ चे हिस्सा होते. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपट सोडण्याबाबत जाहीर केले होते. चित्रपटाची निर्मीती अक्षय कुमार करत आहे. दरम्यान, परेश यांनी अचानक चित्रपट सोडल्यानंतर अक्षयच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटिस पाठवली होती. अक्षयची वकील पूजा तिडके म्हणाल्या होत्या की, प्रोडक्शन कंपनीने या चित्रपटावर खूप पैसा खर्च केला आहे, त्यामुळे या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

वाद वाढल्यानंतर परेश रावल यांनी चित्रपटाची साइनिंग अमाऊंट ११ लाख रुपये ५ टक्के व्याजासहित परत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT