नात्यांची चटकदार ‘पाणीपुरी’ आपल्या रिलीज होणार आहे instagram
मनोरंजन

PaniPuri Movie | मकरंद देशपांडे-सायली संजीवचा ‘पाणीपुरी’ उद्या भेटीला

उद्या रिलीज होतोय ‘पाणीपुरी’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - तिखट आणि गोड पाण्याची जमलेली चव पाणीपुरीची लज्जत वाढवते. प्रेमातून आणि रुसव्या फुगव्यातून नात्यांची जमलेली अशीच चटकदार ‘पाणीपुरी’चाखायची असेल तर १५ नोव्हेंबरला येणारा ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येतोय. एस. के. प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेल्या ‘पाणीपुरी’ चित्रपटाचे संजीवकुमार अग्रवाल निर्माते आहेत. तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत.

पाणीपुरीची लज्जत तिखट गोड पाण्यात सामावलेली असते. सहजीवनात नात्यांचंही तसंच असतं. मुरलेल्या नात्याची अशीच खुमासदार गोष्ट असलेल्या ‘पाणीपुरी’ चित्रपटात नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा दाखविण्यात आली आहे. सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन नक्की करणार आहे.

नात्यात खूप गोष्टी बदलतात, पण तेच नातं मुरतं तेव्हा अधिक गोड होतं, हाच विचार घेऊन मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे,प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतीक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदी कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ ची चव चाखायला देणार आहेत.

चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT