Panchayat Season  pudhari
मनोरंजन

Panchayat Season 5 Release Date : फुलेरा मैं आपका इंतजार रहे गा... तारीख झाली जाहीर! बनराकस होणार पुढचा प्रधानपती?

Anirudha Sankpal

Panchayat Season 5 Release Date : अमेझॉन प्राईमवरील सर्वात गाजलेली पंचायत वेब सीरीजचा पुढचा पाचवा सिजन येत्या ३ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. याबाबची घोषणा प्राईमने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली असून यात सीजनमध्ये सचिवजींची हालत खस्ता होणार हे पोस्टरवरूनच दिसत आहे. त्यामुळं डिसेंबरच्या थंडीत फुलेराच्या राजकारणाची उष्णता वाढणार असं दिसतं.

पंचायत सीजन ५ चे पोस्टर

पंचायतच्या निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर करून पाचव्या सीजनची रिलीज डेट जाहीर केली. पंचायत जे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. त्यात फुलेरा ग्राम पंचायतीचं ऑफिस, त्या ऑफिसवर बनराकर, क्रांती देवी, प्रधान जी, मंजू देवी आणि रिंकी दिसतात. तर खाली जमिनीवर पडलेले अभिषेक आणि विकास दिसत आहेत. बनराकस सचिव जींना जमिनीवर लोळवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

रिलीज डेट जाहीर करत दिली खुशखबरी

इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करून अमेझॉन प्राईमने त्याला थोडे वाद, थोडे प्रेम राहणार, फुलेरामध्ये आपली वाट पाहतो आहे. असे कॅप्शन दिलं. पंचायतचा नवा सीजन हा ३ जिसेंर रोजी रिलीज होणार आहे. आधी या वर्षी पुढचा सीजन येणार नाही अशी घोषणा मेकर्सनी केली होती. मात्र अचानक रिलीज डेट जाहीर करत सर्वांना सुखद धक्का दिला.

खास पद्धतीनं सीजन ५ ची झाली होती घोषणा

पंचायत वेब सीरिजच्या मेकर्सनी panchayatdate.com वर एक गेम सुरू केला होता. त्यात चाहत्यांना बनराकसला फुलांची माळ घालायची होती. अट होती की बनराकसला जर १ कोटी हार मिळाले तर मेकर्स पुढच्या सीजनची डेट जाहीर करणार.

चाहत्यांनी या गेममध्ये सहभाग घेण्यासाठी झुंबड केल्यानंतर अखेर साईट क्रॅशच झाली. त्यानंतर फुलांच्या हारांमध्ये हरवलेल्या बनराकसचा एक व्हिडिओ शेअऱ केला. यात नव्या प्रधानपतीला एवढं प्रेम दिल्याबद्दल आभार. आता मतदान करू नका आम्ही उद्या डेट जाहीर करतो अशी विनंती केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT