Panchayat fame Aasif Khan Discharged from hospital
मुंबई - 'पंचायत'चा दामाद जी ची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला हार्ट ॲटॅक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर त्याने हार्ट ॲटॅकविषयी खुलासा केला आहे. त्याची प्रकृती ठिक आहे.
एका वेबसाईटशी बोलताना आसिफ खानने स्पष्ट केले की, 'सर्वात आधी तर मी हे सांगू इच्छितो की, मला हार्ट ॲटॅक आला नव्हता. मला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स झाले होते. त्याचे लक्षण हार्ट ॲटॅक सारखे दिसत होते. पण, मी पूर्णपणे फिट आहे.'
जेव्हा आसिफ आपले घर राजस्थानमधून मुंबईपर्यंत ड्राईव्ह करत आला होता, तेव्हा ही घटना घडली होती. मुंबईत आल्यानंतर त्याला छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी वृत्त समोर आले होते की, त्याला हार्ट ॲटॅक आला होता. पण आता खुद्द त्याने हे स्पष्ट केलं की, त्याला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्सला सामोरं जावं लागलं होतं.
आसिफ पुढे म्हणाला की, डॉक्टरनी त्याला आपल्या जीवनशैलीत बदल करायला सांगितलं आहे. खासकरून डाएटवर लक्ष ठेवायला सांगितले आहे आणि दाल बाटी खाण्यास मनाई केली आहे. मांसाहार देखील कमी करण्यास सांगितले. सोबतचं अधिक वर्कआऊट करण्याचा सल्ला दिलाय.