पंचायत सीझन 4 नंतर पंचायत 5ची नांदीही झाली आहे. पण सीझन 4 मधील एका सीनची चर्चा मात्र थांबताना दिसत नाहीये. या सीनला शेवटच्या एडिटिंगमधून हटवल्यानंतर नेटीझन्सनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
हा सीन होता सचिवजी आणि रिंकी यांचा किसिंग सीन. हा सीन सिरिजमधून काढल्यानंतर सचिव साकारणारे जितेंद्र कुमार यांनी याचा खुलासा केला आहे.
खरे तर या दोघांची प्रेमकहाणी एक पाऊल पुढे जाण्याची चाहते आतुरतेने वाट पहात होते. तशी ती गेलीही. पण या प्रेमकाहाणीत जो स्पार्क होता तो म्हणजे सचिवजी आणि रिंकी यांचे चुंबनदृश. मेकर्सनी तो सीन सिरिजमध्ये नसल्याने अनेक चाहते निराशही झाले आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना जितेंद्र कुमार म्हणतात, या दृश्याबाबत सानविकाचे मत मला योग्य वाटले. ही सिरिज एका कौटुंबिक सिरिजप्रमाणे आहे. त्यामुळे असे सीन सर्व प्रेक्षकांना आवडतीलच असे नाही. या सिरिजचा बाज हा ग्रामीण आहे. त्यामुळे प्रेक्षक कुटुंबांसह ही सिरिज पाहू शकतो. अशावेळी सिरिजमधील हे सीन कुटुंबासोंबत पाहताना अवघडल्यासारखे वाटू शकतात. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनेचा विचार करून हे सीन योग्यप्रकारे शूट केले गेले.
त्यांना विचारले गेले की हे दृश्य शूट करण्याआधी त्यांची परवानगी घेतली गेली होती का? त्यावेळी ते म्हणतात, मी या संदर्भात सर्वप्रथम सानविका हिची सहमति विचारात घेण्याचे ठरवले होते. कारण माझ्यासाठी ते जास्त महत्तवाचे होते. हा क्षण एका हटके पद्धतीने मजेदारही बनवायचा होता. ज्यामध्ये दोघेही लाइट बंद झाल्यावर एकमेकांना किस करण्यासाठी खाली वाकतात. खरे पाहता मला ऑनस्क्रीन असे सीन शूट करण्यात काहीच हरकत नाही. मी सिनेमा आणि वेब कंटेंटमध्येही अनेकदा किसिंग सीन दिले आहेत. ज्यामध्ये शुभमंगल सावधान सिनेमामधील आयुष्मान खुरानासोबतच्या किसिंग सीनचाही समावेश आहे.
अनेकदा असे सीन कथानक पुढे नेण्यासाठी उपयोगी पडतात. असे क्षण स्क्रीनवर सहज आणि स्वाभाविक वाटणे गरजेचे आहे.’
सीझन 4 ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर पंचायतच्या मेकर्सनी नुकतीच सीझन 5 ची ही घोषणा केली आहे. चौथ्या सीझनमध्ये क्रांतिदेवी आणि बनराकस या जोडीने निवडणूक जिंकल्यानंतर आता फुलेरामध्ये काय धमाल उडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 2026 मध्ये पंचायतच्या पाचव्या सीझनचा प्रीमियर होणार आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुवीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सानविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवर, अशोक पाठक आणि पंकज झा ही स्टारकास्ट पाचव्या सीझनमध्ये काय धमाल करते ते कळेलच.